मुंबई, 1 मे : टीम इंडियाच्या टेस्ट टीममधून वगळण्यात आलेला दिग्गज खेळाडू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) सध्या इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट (County Championship) खेळत आहे. त्याला खराब फॉर्मुळे श्रीलंका विरूद्धच्या सीरिजमधून वगळण्यात आले होते. तसंच आयपीएल ऑक्शनमध्येही कुणी खरेदी केलं नव्हतं. या सर्व सेटबॅकनंतरही पुजारानं हार मानली नाही. तो इंग्लंडमध्ये जाताच रनमशिन बनला आहे. पुजारानं इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये दोन डबल सेंच्युरी झळकावत माजी कॅप्टन मोहम्मद अझहरूद्दीनच्या (Mohammad Azharuddin) 28 वर्ष जुन्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. पुजारा इंग्लिश कौंटीमध्ये ससेक्स टीमकडून खेळत आहे. त्यानं डरहॅमविरूद्ध 203 रनची खेळी केली. या सिझनमधील पुजाराची ही दुसरी डबल सेंच्युरी आहे. त्यानं मागच्या आठवड्यात डर्बीशायर विरूद्ध 201 रन काढले होते. पुजारानं या सिझनमधील 5 इनिंगमध्ये 6, 201*, 109, 12 आणि 203 रन केले आहेत. अझरची बरोबरी पुजारानं 324 बॉलमध्ये 24 फोरच्या मदतीनं 203 रन काढले. तो शुक्रवारी खेळ संपला तेव्हा 128 रन काढून खेळत होता. त्याच्या खेळीमुळे ससेक्सनं पहिल्या इनिंगमध्ये 538 रनचा विशाल स्कोर केला. ससेक्सला पहिल्या इनिंगमध्ये 315 रनची आघाडी मिळाली. डरहॅमनं शनिवारचा खेळ संपला तेंव्हा दुसऱ्या इनिंगमध्ये बिनबाद 38 रन केले आहेत. पुजारानं यावेळी टीम इंडियाचा माजी कॅप्टन मोहम्मद अझहरूद्दीनच्या रेकॉर्डची बरोबरी केली. अझरनं 1991 आणि 1994 मध्ये इंग्लिश कौंटी स्पर्धेत डबल सेंच्युरी झळकावली होती. पुजारानं एकाच सिझनमधील फक्त 3 मॅचमध्ये त्याचा बरोबरी केली आहे. अश्निनच्या बायकोनं जिंकलं मन, रडणाऱ्या रितिकाला दिली ‘जादूची झप्पी’ VIDEO टीम इंडिया जुलै महिन्यांत इंग्लंड दौऱ्यावर एकमेव टेस्ट मॅच खेळण्यासाठी जाणार आहे. त्या टेस्टसाठी पुजारानं दावेदारी भक्कम केली आहे. या टेस्टसाठी टीम इंडियाची निवड करताना पुजारानं इंग्लंडमध्ये केलेल्या खेळींकडं निवड समितीला दुर्लक्ष करता येणार नाही
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







