Home /News /sport /

सचिन तेंडुलकरला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज नव्हती, 'या' मंत्र्यांचं धक्कादायक वक्तव्य

सचिन तेंडुलकरला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज नव्हती, 'या' मंत्र्यांचं धक्कादायक वक्तव्य

सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) काही दिवसांपूर्वी कोरोनाची (Coronavirus) लागण झाली होती. टीम इंडियाच्या माजी कॅप्टनला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज नव्हती, असं वक्तव्य मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी केलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 15 एप्रिल: महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) काही दिवसांपूर्वी कोरोनाची (Coronavirus) लागण झाली होती. सचिनला त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पिटलमध्ये उपचार झाल्यानंतर सचिन घरी परतला आहे. सचिनच्या या आजारपणावर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. टीम इंडियाच्या माजी कॅप्टनला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज नव्हती, असं वक्तव्य शेख यांनी केलं आहे. अस्लम शेख यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. "Asymptomatic सेलिब्रेटींनी घरामध्येच उपचार करणे आवश्यक आहे. त्यांनी हॉस्पिटलमध्ये बेड अडवून ठेवू नये. अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर सारख्या काही सेलिब्रेटींना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची आवश्यकता नव्हती." असं मत शेख यांनी व्यक्त केलं आहे. सचिन तेंडुलकरने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये (Road Safety World Series) भाग घेतला होता. या सीरिजमध्ये सचिनने इंडिया लिजंड्सचं (India Legends) नेतृत्व केलं होतं. सचिनच्याच कॅप्टन्सीमध्ये इंडिया लिजंड्सने फायनलमध्ये श्रीलंका लिजंड्सचा (Sri Lanka Legends) पराभव केला होता. या स्पर्धेच्या काही दिवसानंतरच सचिनला कोरोनाची लागण झाली. या सीरिजमध्ये खेळणाऱ्या युसूफ पठाण, इरफान पठाण आणि एस बद्रीनाथ यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. 27 मार्चला सचिन तेंडुलकरची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती, त्यानंतर त्याने स्वत:ला घरातच आयसोलेट केलं होतं, पण 2 एप्रिलला सचिनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर 8 एप्रिल रोजी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पुढचे काही दिवस सचिन घरातच क्वारंटाईन असेल. मनिष पांडे आऊट होताच SRH च्या 'मिस्ट्री गर्ल'चा चेहरा पडला, Video Viral कोरोनाचा दिल्लीला फटका कोरोना व्हायरसचा दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या आयपीएल टीमला मोठा बसला. दिल्लीचा आफ्रिकन वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्कियाला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तो सलग दुसरा सामना खेळू शकणार नाही. कागिसो राबाडा देखील त्याच्या संपर्कात आल्याने  विलगीकरणात आहे अक्षर पटेलही कोरोनाचा सामना करत असल्याने तोही या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. दिल्ली कॅपिटल्सची दुसरी लढत गुरुवारी राजस्थान रॉयल्सशी होत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Akshay Kumar, Coronavirus, India, ROAD SAFETY CAMPAIGN, Sachin tendulakar, Sri lanka

    पुढील बातम्या