जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / धोनीने का केलाय असा अवतार? माहीचा बौद्ध भिख्खूच्या लुकमधील फोटो Viral

धोनीने का केलाय असा अवतार? माहीचा बौद्ध भिख्खूच्या लुकमधील फोटो Viral

धोनीने का केलाय असा अवतार? माहीचा बौद्ध भिख्खूच्या लुकमधील फोटो Viral

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) नेहमी त्याच्या हेअर स्टाईलमुळे चर्चेत असतो. त्याचा एक नवा फोटो समोर आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 मार्च : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) नेहमी त्याच्या हेअर स्टाईलमुळे चर्चेत असतो. लांब केसांची त्याची स्टाईल एकेकाळी खूप लोकप्रिय होती. त्यानंतर त्याने केस कमी केले. आता त्याचा एक नवा फोटो समोर आला आहे, तो यापूर्वीपेक्षा पूर्ण वेगळा आहे. स्टार स्पोर्ट्स (Star Sports) या आयपीएलच्या अधिकृत ब्रॉडकास्टरने हा फोटो त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. त्यामध्ये तो मुंडन करुन बौद्ध भिख्खूच्या कपड्यांमध्ये बसलेला दिसत आहे. हा फोटो थोड्याच वेळात सोशल मीडियावर Viral झाला आहे. धोनीनं हा लुक कशासाठी केला आहे, हे अजून समजलेलं नाही. मात्र आयपीएल 2021 (IPL 2021) संबंधित जाहिरातीचं शूटिंग करण्यासाठी धोनीचा हा अवताार असावा असा अंदाज आहे. दोन दिवसांपूर्वी धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) ट्रेनिंग कॅम्पमध्ये दिसला होता. त्यावेळी त्याच्या डोक्यावर केस होते. त्यानंतर अचानक धोनीचा हा फोटो समोर आला आहे. क्रिकेट फॅन्सना मात्र धोनीचा हा लूक आवडला आहे.

null

चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) या सिझनसाठी तयारी सुरु केली आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी **(**याच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा ट्रेनिंग कॅंम्प (Training Camp) सुरु झाला असून खेळाडूंनी जोरदार सराव सुरु केला आहे. आयपीएल सुरु होण्यास एका महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सीएसकेचा कॅप्टन आणि खेळाडूंनी सरावासाठी कंबर कसली आहे. (हे वाचा- 6,6,6,6… युवराज सिंगचा जुना अवतार, सहा सिक्स लगावत जागवल्या आठवणी; पाहा VIDEO ) टीम इंडियाचा माजी कर्णधार मागील सिझन विसरुन पूर्ण जोशात तयारीला लागला आहे. मागच्या वर्षी इतिहासात प्रथमच चेन्नई सुपर किंग्ज प्ले ऑफमध्ये पोहचू शकली नव्हती. त्यामुळे या मोसमात टीम जोरदार पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. त्यासाठी खेळाडूंनी ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभागी होण्यास प्राधान्य दिलं आहे. याच बरोबर धोनी देखील आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतताना दिसत आहे. धोनीच्या फटकेबाजीचा एक व्हिडीओ चेन्नई सुपर  किंग्सने नुकताच शेअर केला होता. धोनीचा सरावातील फॉर्म मॅचमध्येही कायम राहिला तर यावर्षी आयपीएलमध्ये क्रिकेट फॅन्सना जुन्या धोनीचा खेळ पाहयला मिळू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात