मुंबई, 21 जून: भारतीय विरुद्ध इंग्लंड यांच्या महिला टीममधील (India Women vs England Women) ब्रिस्टलमध्ये खेळण्यात आलेली एकमेव टेस्ट ड्रॉ झाली. या टेस्टमध्ये शफाली वर्मानं (Shafali Verma) दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतक झळकावलं. तर स्नेह राणानं (Sneh Rana) दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 80 रन करत टीम इंडियाचा पराभव टाळला. भारतीय महिला टीमनं तब्बल सात वर्षांनी टेस्ट मॅच खेळली. पहिल्या इनिंगमध्ये फॉलो ऑन मिळाल्यानंतरही भारतीय टीमनं जिद्दीनं खेळ करत टेस्ट मॅच ड्रॉ केली. या टेस्टमध्ये सर्वच नवोदीत खेळाडूंनी चांगला खेळ करत क्रिकेट फॅन्सचं मन जिंकलं. त्याचवेळी टीम इंडियाची अनुभवी खेळाड़ू स्मृती मंधानाचा (Smriiti Mandhana) लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्मृती ही बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा सुंदर आहे. तिला यासाठी कोणतंही सौंदर्य प्रसाधन वापरण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया नेटीझन्सनी व्यक्त केली आहे. तिचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाले आहेत.
Smriti Mandana Without Mekeup > Bollywood Actress Without Mekeup. pic.twitter.com/HCYpVhVBWI
— 𝘽𝘼𝙏𝙈𝘼𝙉 (@TryingSilent) June 19, 2021
Smriti mandana ❤️@Indiancricket86 @mandhana_smriti
— Indian cricket (@Indiancricket86) June 18, 2021
#Cricket #cricketlovers pic.twitter.com/iC1pbmg7Mm
Smriti Mandana 😘😘😍😍😍 pic.twitter.com/SiVPDXiKaQ
— JR NTR - ViratKohliᴿᴿᴿ (@Vinodbaadshah18) June 17, 2021
I'm a fan of this 18th jersey 😉
— Arunima (@_your_honeybee_) June 17, 2021
Class on blood ! Smriti Mandana out on 78 runs! Well played 🙌🏻
Vintage Sourav Ganguly vives! 💙 pic.twitter.com/k8oKxyGPZI
WTC Final : आणि विराट मैदानातच भांगडा करायला लागला स्मृतीनं ब्रिस्टल टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये 78 रन काढले. त्यावेळी तिने शफाली वर्मासोबत पहिल्या विकेटसाठी 167 रनची भागीदारी केली. हा एक भारतीय रेकॉर्ड आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र ती अपयशी ठरली. दुसऱ्या इनिंगमध्ये स्मृती फक्त 8 रन काढून आऊट झाली. या टेस्टमधील प्रत्येक क्षण स्पेशल असल्याची भावना स्मृतीनं मॅच संपल्यानंतर व्यक्त केली.