मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

वडिलांच्या आठवणीने सौरव गांगुली भावुक, फोटो शेअर करत म्हणाला...

वडिलांच्या आठवणीने सौरव गांगुली भावुक, फोटो शेअर करत म्हणाला...

टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) सध्या आयपीएल (IPL 2021) आणि टी 20 वर्ल्ड कपच्या तयारीत व्यस्त आहे

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 29 मे : टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) सध्या आयपीएल (IPL 2021) आणि टी 20 वर्ल्ड कपच्या तयारीत व्यस्त आहे. गांगुलीच्या अध्यक्षतेखाली याच विषयावर बीसीसीआयची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत या दोन्ही स्पर्धांबाबत मोठा निर्णय अपेक्षित आहे. या सर्व धावपळीत गांगुलीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. सौरव गांगुलीचे वडिल चंडीदास गांगुली यांचे दीर्घ आजाराने 2013 साली निधन झाले आहे.

गांगुलीने जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये त्याचे वडिल टीम इंडियाच्या माजी कॅप्टनसोबत आहेत. गांगुलीने तेंव्हा कॅप्टन म्हणून एक ट्रॉफी जिंकलेली होती. गांगुलीने त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "काही आठवणी तुमच्या सोबत राहतात.'

गांगुलीच्या करियरमध्ये त्याचे वडिलांचे मोठे योगदान होते. ते क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (CAB) सदस्य होते. त्याचबरोबर कोषाध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष आणि ट्रस्टी या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या. गांगुलीला 2005 साली टीम इंडियातून वगळल्यानंतर त्यांनी बोर्डाच्या कार्यालयात जाणे बंद केले होते. सौरव गांगुलीचा भाऊ स्नेहाशीष गांगुली देखील प्रथमश्रेणी क्रिकेटपटू होता.

गांगुलीची क्रिकेट कारकिर्द

सौरव गांगुली टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टनपैकी आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये भारतीय टीमने टेस्ट आणि वन-डे मिळून एकूण 196 सामने खेळले. त्यापैकी 97 सामने जिंकले तर 79 मध्ये पराभव झाला. गांगुली कॅप्टन असताना टीम 2003 मधील वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली होती.

टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजेता खेळाडू CPL 2021 मध्ये खेळणार!

सौरव गांगुलीने 113 टेस्टमध्ये 7212 आणि 311 वन-डेमध्ये 11363 रन काढले. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमधील एकूण रनची संख्या 33 हजारांपेक्षा जास्त आहे.

First published:

Tags: Instagram post, Sourav ganguly