जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सौरव गांगुली अडचणीत! निवड समितीच्या सदस्यानं केला धक्कादायक खुलासा

सौरव गांगुली अडचणीत! निवड समितीच्या सदस्यानं केला धक्कादायक खुलासा

सौरव गांगुली अडचणीत! निवड समितीच्या सदस्यानं केला धक्कादायक खुलासा

भारतीय क्रिकेटमधील विराट कोहली विरूद्ध बीसीसीआय (Virat Kohli vs BCCI) हा वाद अद्याप पूर्ण संपलेला नाही. त्यातच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) नव्या वादात सापडले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 फेब्रुवारी: भारतीय क्रिकेटमधील विराट कोहली विरूद्ध बीसीसीआय (Virat Kohli vs BCCI) हा वाद अद्याप पूर्ण संपलेला नाही. त्यातच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) नव्या वादात सापडले आहेत. गांगुली निवड समितीच्या बैठकींना उपस्थित राहत असल्याचा वाद (Sourav Ganguly Attending Team Meetings) आता सुरू झाला आहे. बीसीसीआय अध्यक्षांनी निवड समितीच्या बैठकीला उपस्थित असणे हे बोर्डाच्या घटनेच्या विरोधी आहे. या संपूर्ण विषयावर निवड समितीच्या सदस्यानं मोठा खुलासा केला आहे. टीम इंडियाच्या वरिष्ठ निवड समितीच्या सदस्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘इनसाईड स्पोर्ट्स’ला याबाबतची माहिती दिली आहे. ‘जे आहे ते आहे. तुम्ही तुमच्या बॉसची तक्रार करू शकतही. गांगुली यांनी कधीही टीम निवडीमध्ये हस्तक्षेप केला नाही. पण, त्यांच्या उपस्थितीचं दडपण असतं. कारण ते बीसीसीआय अध्यक्ष आहेत. मी या विषयावर आणखी काही बोलू शकत नाही.’ असा खुलासा या सदस्यानं केला आहे. सौरव गांगुली निवड समितीच्या बैठकांना उपस्थित राहत असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर इनसाई़ड स्पोर्ट्सनं बीसीसीआयच्या विद्यमान अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली. त्यावेळी त्यांना वेगवेळी उत्तरं मिळाली. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं ही बातमी निराधार असल्याचं स्पष्ट केलं. तर दुसऱ्या अधिकाऱ्यांनी यामध्ये तथ्य असल्याचा दावा केला. गांगुली एक किंवा दोन नाही तर अनेक बैठकांना उपस्थित होते, अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं दिली आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये राडा, सर्फराजचा माजी कॅप्टनवर फिक्सर असल्याचा जाहीर आरोप काय आहे बीसीसीआयची घटना? बीसीसीआयच्या घटनेनुसार अध्यक्षांना निवड समितीच्या बैठकींना उपस्थित राहण्याचा कोणताही अधिकार नाही. तर सचिव (जय शहा) समितीचे संयोजक या नात्यानं बैठकांना उपस्थित राहू शकतात. ’ त्यामुळे गांगुलींच्या उपस्थितीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. गांगुलींची उपस्थिती निवड समितीच्या कामकाजावर प्रभाव टाकणारी आहे, असा आरोप करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात