मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /पाकिस्तान क्रिकेटमध्ये राडा, सर्फराजचा माजी कॅप्टनवर फिक्सर असल्याचा जाहीर आरोप

पाकिस्तान क्रिकेटमध्ये राडा, सर्फराजचा माजी कॅप्टनवर फिक्सर असल्याचा जाहीर आरोप

पाकिस्तान क्रिकेटमधील (Pakistan Cricket) मतभेद पुन्हा एकदा जगजाहीर झाले आहेत. पाकिस्तानचा माजी कॅप्टन सर्फराज अहमदनं (Sarfaraz Ahmed) त्याच्याच देशाच्या माजी कॅप्टनवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई, 3 फेब्रुवारी: पाकिस्तान क्रिकेटमधील (Pakistan Cricket) मतभेद पुन्हा एकदा जगजाहीर झाले आहेत. पाकिस्तानचा माजी कॅप्टन सर्फराज अहमदनं (Sarfaraz Ahmed) त्याच्याच देशाच्या माजी कॅप्टनवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा (PSL 2022) सध्या सुरू आहे. या स्पर्धेत क्वेटा ग्लॅडिएटर्स टीमचा सर्फराज कॅप्टन आहे. त्याने पाकिस्तानचा माजी कॅप्टन सलमान बटवर (Salman Butt) निशाणा साधला आहे.

पाकिस्तान सुपर लीगमधील एका मॅचच्या दरम्यान सर्फराज चांगलाच रागवलेला आढळला होता. त्याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये क्वेटाचा बॉलर नसीम शहानं त्याला हवी तशी फिल्डिंग लावण्यासाठी सर्फराजला हात जोडून विनंती केली होती. या प्रकरणावर सलमाननं सर्फराजवर टीका केली होती. सर्फराजकडे कोणतीही रणनीती नाही. तो फक्त सहकारी खेळाडूंवर ओरडत असतो, असा टोला सलमाननं लगावला होता.

U19 World Cup: टीम इंडिया होणार चॅम्पियन, फायनलपूर्वीच जुळला जबरदस्त योग

सर्फराजनं ट्विट करत सलमान बट्ला उत्तर दिलं आहे. त्यानं या ट्विटमध्ये अर्थातच कुणाचंही नाव घेतलेलं नाही. 'पाकिस्तानला ऑन ड्यूटी विकणारा फिक्सर नैतिकतेवर भाषण देत असेल तर अल्लाहच हाफिज आहे.' असं ट्विट सर्फराजनं केलं आहे. सलमान बट 2010 साली इंग्लंड विरुद्ध झालेल्या लॉर्ड्स टेस्टमध्ये फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता. सर्फराजनं तो संदर्भ देत नाव न घेता सलमानला टोला लगावला आहे.

यापूर्वी सलमाननं त्याच्या यूट्यूब चॅनेलवरून सर्फराजला टारेगेट केले होते. 'तो (सर्फराज) मॅचच्या दरम्यान बोलत नाही. सतत खेळाडूंवर ओरडत असतो. त्याच्याकडे कोणतीही रणनीती नसते. तो स्वत:चं मत इतर खेळाडूंवर लादतो. सर्फराज पीएसएलमध्ये सुरूवातीपासून एकाच टीमचा सदस्य आहे. त्याने इतरांवर भडकल्यापेक्षा स्वत:चा खेळ सुधारावा,' असा सल्ला त्याला सलमाननं दिला होता.

First published:

Tags: Cricket, Cricket news, International, Pakistan, Social media, Sports, Spot fixing