मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : 'टी-20 सीरिज रद्द केली नाही तर जाळून घेऊ,' पोलिसांना फोन करून धमकी

IND vs ENG : 'टी-20 सीरिज रद्द केली नाही तर जाळून घेऊ,' पोलिसांना फोन करून धमकी

'कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, भारत-इंग्लंडमधली (India-England) टी-20 सीरिज (India-England T20 Series) रद्द केली नाही, तर स्वतःला जाळून घेईन,' अशी धमकी गुजरातेतल्या (Gujarat) गांधीनगरमधल्या एका व्यक्तीने पोलीस इन्स्पेक्टरला फोन करून दिली.

'कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, भारत-इंग्लंडमधली (India-England) टी-20 सीरिज (India-England T20 Series) रद्द केली नाही, तर स्वतःला जाळून घेईन,' अशी धमकी गुजरातेतल्या (Gujarat) गांधीनगरमधल्या एका व्यक्तीने पोलीस इन्स्पेक्टरला फोन करून दिली.

'कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, भारत-इंग्लंडमधली (India-England) टी-20 सीरिज (India-England T20 Series) रद्द केली नाही, तर स्वतःला जाळून घेईन,' अशी धमकी गुजरातेतल्या (Gujarat) गांधीनगरमधल्या एका व्यक्तीने पोलीस इन्स्पेक्टरला फोन करून दिली.

पुढे वाचा ...

    अहमदाबाद, 16 मार्च : 'कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, भारत-इंग्लंडमधली (India-England) टी-20 सीरिज (India-England T20 Series) रद्द केली नाही, तर स्वतःला जाळून घेईन,' अशी धमकी गुजरातेतल्या (Gujarat) गांधीनगरमधल्या एका व्यक्तीने पोलीस इन्स्पेक्टरला फोन करून दिली. पंकज पटेल नावाच्या एका व्यक्तीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. व्ही. पटेल यांना 12 मार्च रोजी धमकीचा फोन केला. त्याबद्दल अहमदाबादमधल्या चांदखेडा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या या क्रिकेट सीरिजशी संबंधित सुरक्षाविषयक जबाबदारी के. व्ही. पटेल यांच्याकडे आहे. मोटेरा (Motera) इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) हे सामने होत आहेत.

    या दोघांमध्ये झालेल्या कॉलचं रेकॉर्डिंग शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झालं. या सामन्यांवेळी कोविडच्या अनुषंगाने गाइडलाइन्स (Covid Guidelines) पाळल्या जात आहेत का, असा सवाल पंकजने त्यात केला आहे. हे सामने मर्यादित प्रेक्षकांच्या उपस्थितीत झाले, पण तिसऱ्या टी-20 पासून प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेशाला बंदी करण्यात आली आहे. सध्याची स्थिती पाहता कोरोनामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न यामुळे निर्माण होऊ शकतो, असं पंकजने या कॉलमध्ये पोलिसांना सांगितलं आहे.

    सध्या सुरू असलेली ही सीरिज रद्द केली नाही, तर आपण स्वतःला जाळून घेऊ, अशी धमकी पंकजने वरिष्ठ पोलिस इन्स्पेक्टर के. व्ही. पटेल यांना दिल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. गुजरातमध्ये रविवारी (14 मार्च) 810 नवे कोरोनाबाधित आढळले असून, राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या दोन लाख 78 हजार 207 झाली आहे.

    राज्यात नव्याने येत असलेल्या कोरोना साथीला नियंत्रणात ठेवण्यात अयशस्वी झाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री विजय रूपाणी (Vijay Rupani) आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल (Nitin Patel) यांच्याबद्दल पंकजने अपशब्द वापरल्याचंही वृत्त आहे. या कॉलनंतर के. व्ही. पटेल यांनी तातडीने गांधीनगर पोलिस कंट्रोल रूमला फोन करून संबंधित व्यक्तीचा नंबर आणि अन्य माहिती दिली. पोलिसांनी पंकज पटेलविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 505 (2), कलम 507 आणि कलम 504 या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. द्वेष पसरवणं, धमकी देणं, जाणूनबुजून अपमान करणं आदी गुन्ह्यांसाठीची ही कलमं आहेत.

    भारत आणि इंग्लंड यांच्यात अलीकडेच झालेल्या तिसऱ्या टेस्टआधी अहमदाबादमधल्या मोटेरा क्रिकेट स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम असं करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं होतं. एक लाख 10 हजार प्रेक्षकांची बैठकव्यवस्था असलेलं हे जगातलं सर्वांत मोठं स्टेडियम आहे. हे स्टेडियम 1982मध्ये बांधण्यात आलं होतं आणि सुरुवातीला तिथे 49 हजार प्रेक्षकांची बैठकव्यवस्था होती. आता नुकतंच त्याचं नूतनीकरण करण्यात आलं आहे.

    63 एकरवर पसरलेल्या या स्टेडियमच्या आवारात इन्डोअर क्रिकेट अॅकॅडमीही असून, 40 खेळाडूंसाठी डॉर्मिटरीही आहे. चार टीम्सना पुरतील एवढ्या ड्रेसिंग रूम्सही तिथे असून, एकमेवाद्वितीय प्रकारची व्यायामशाळा, सहा इन्डोअर सरावासाठीच्या खेळपट्ट्या, तीन आउटडोअर सरावासाठीच्या खेळपट्ट्या अशा सुविधा तिथे आहेत.

    आता हे स्टेडियम जगातलं सर्वांत मोठं क्रिकेट स्टेडियम आणि जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं स्पोर्ट्स ग्राउंड ठरलं आहे. नूतनीकरण केलेल्या या स्टेडियममध्ये आता ऑस्ट्रेलियातलं मेलबोर्न क्रिकेट मैदान आणि भारतातल्या इडन गार्डन्स यांच्यापेक्षाही जास्त प्रेक्षक बसू शकतात. इडन गार्डन्समध्ये 66 हजार 349 प्रेक्षक बसू शकतात आणि ते तिसऱ्या क्रमांकाचं क्रिकेट मैदान आहे.

    First published:
    top videos

      Tags: Cricket news, India vs england