मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

सौरव गांगुलीला ICC मध्ये मिळणार मोठी जबाबदारी, अनिल कुंबळेची घेणार जागा

सौरव गांगुलीला ICC मध्ये मिळणार मोठी जबाबदारी, अनिल कुंबळेची घेणार जागा

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीकडं (Sourav Ganguly) आता लवकरच इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल समितीची (ICC) मोठी जबाबदारी येणार आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीकडं (Sourav Ganguly) आता लवकरच इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल समितीची (ICC) मोठी जबाबदारी येणार आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीकडं (Sourav Ganguly) आता लवकरच इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल समितीची (ICC) मोठी जबाबदारी येणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 17 नोव्हेंबर : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीकडं (Sourav Ganguly) आता लवकरच इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल समितीची (ICC) मोठी जबाबदारी येणार आहे. आयसीसीच्या क्रिकेट समितीचं अध्यक्षपद गांगुलीला मिळणार आहे. यापूर्वी हीा जबाबदारी गांगुलीचाच टीम इंडियातील सहकारी आणि माजी कॅप्टन अनिल कुंबळेकडं (Anil Kumble) होती.

अनिल कुंबळेची 2016 साली वेस्ट इंडिजचे माजी कॅप्टन क्लाईव्ह लॉयड (Clive Llyod) यांच्या जागी 2012 साली क्रिकेट कमिटीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाली होती. 2016 साली कुंबळेला मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर आता ही मुदत संपल्यानंतर त्याच्या जागी गांगुलीची नियुक्ती करण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. क्रिकेटमधील नियम तयार करणे आणि त्याचे नियमन करणे ही जबाबदारी या समितीची असते.

BCCI साठी आनंदाची बातमी

2024 ते 2031 या कालखंडात भारतामध्ये 3 आयसीसी स्पर्धा होणार आहेत. भारतामध्ये 2026 साली टी20 वर्ल्ड कप, 2029 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2031 साली वन-डे वर्ल्ड कप होणार आहे. या तीन मोठ्या स्पर्धांसाठी बीसीसीआयला दिलासा मिळाला आहे. या सर्व स्पर्धांसाठी आयसीसी भारत सरकारला 10 टक्के टॅक्स देण्यास तयार झालं आहे. त्यामुळे बीसीसीआयचे 1500 कोटी वाचणार आहेत.

राहुल द्रविडमुळे टीम इंडियात आनंदाचं वातावरण, स्टार खेळाडूनं सांगितलं कारण

यापूर्वी 2016 साली झालेला टी20 वर्ल्ड कप आणि 2023 साली होणाऱ्या वन-डे वर्ल्ड कपच्या आयोजनात  बीसीसीआयचं 750 कोटींचं नुकसान होणार आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'मधील वृत्तानुसार भारत सोडून अन्य देशांमधील क्रिकेट बोर्डाला सरकारनं करामध्ये सवलत दिली आहे. बीसीसीआयला ही सवलत नसल्यानं त्यांचं नुकसान होत होते. यंदाचा वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) भारतामध्ये न होता यूएईमध्ये झाला, अन्यथा बीसीसीआयचे नुकसान आणखी वाढले असते.

First published:

Tags: Cricket news, Icc, Sourav ganguly