मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /ZIM vs BAN : ब्रेक डान्सनंतरचा राडा भोवला! ICC नं केली दोघांनाही शिक्षा, VIDEO

ZIM vs BAN : ब्रेक डान्सनंतरचा राडा भोवला! ICC नं केली दोघांनाही शिक्षा, VIDEO

बांगलादेशचा क्रिकेटपटू तस्कीन अहमद (Taskin Ahmed) आणि झिम्बाब्वेचा फास्ट बॉलर मुजरबानी (Blessing Muzarabani) या दोघांना मैदानातील राडा भोवला आहे.

बांगलादेशचा क्रिकेटपटू तस्कीन अहमद (Taskin Ahmed) आणि झिम्बाब्वेचा फास्ट बॉलर मुजरबानी (Blessing Muzarabani) या दोघांना मैदानातील राडा भोवला आहे.

बांगलादेशचा क्रिकेटपटू तस्कीन अहमद (Taskin Ahmed) आणि झिम्बाब्वेचा फास्ट बॉलर मुजरबानी (Blessing Muzarabani) या दोघांना मैदानातील राडा भोवला आहे.

हरारे, 10 जुलै : बांगलादेशचा क्रिकेटपटू तस्कीन अहमद (Taskin Ahmed) आणि झिम्बाब्वेचा फास्ट बॉलर मुजरबानी (Blessing Muzarabani) या दोघांना मैदानातील राडा भोवला आहे. त्यांच्यावर आयसीसीनं आचार संहिता लेव्हल एकचे उल्लंघन (अयोग्य शारीरिक संपर्क) केल्याबद्दल कारवाई केली आहे. या दोघांच्याही मॅच फिसमधील 15 टक्के रक्कम कापण्यात येणार आहे.

आयसीसीच्या नियमावलीत लेव्हल एकचा नियम हा आंतरराष्ट्रीय मॅचच्या दरम्यान कोणताही खेळाडू, अंपायर, मॅच रेफ्री किंवा अन्य कोणतीही व्यक्तींशी (प्रेक्षकांचा समावेश) अयोग्य पद्धतीने शारीरिक संपर्क करण्याच्या संदर्भात आहे. या प्रकरणात या दोन्ही खेळाडूंना एक डिमेरिट पॉईंट देण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

झिम्बाब्वे आणि बांगलादेश (Zimbabwe vs Bangladesh) यांच्यात हरारेमध्ये टेस्ट सुरु आहे. या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी मुजरबानी आणि बांगलादेशचा तस्कीन अहमद  यांच्यात भर मैदानात वाद झाला. या वादाच्या वेळी मुजरबानीनं तस्कीन अहमदच्या हेल्मेचं ग्रिल डोक्यानं आणि दातानं दाबलं.

बांगलादेशच्या इनिंगमधील 85 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. या ओव्हरमधील मुजरबानीचा चौथा बॉल अहमदनं बचावात्मक पद्धतीनं खेळून काढला.  मुजरबानीचा तो बॉल खेळल्यानंतर अहमदनं मैदानात हात हालवत ब्रेक डान्सच्या स्टेप केल्या. त्यानंतर मुजरबानी संतापला. तो अहमदच्या दिशेने चालून गेला. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला.

IND vs SL : वन-डे मालिकेला कोरोनाचा फटका, 'या' तारखेला होणार पहिला सामना

हरारे टेस्टमध्ये अहमदनं 134 बॉलमध्ये 75 रन काढले. अहमद आऊट होत नसल्यानं मुजरबानी वैतागला होता. या मॅचमध्ये बांगलादेशची अवस्था 6 आऊट 132 होती. त्यानंतर महमूदुल्लाह (Mahmudullah) आणि अहमद यांनी 9 व्या विकेटसाठी 191 रनची भागिदारी केली.

First published:

Tags: Bangladesh cricket team, Cricket, Video Viral On Social Media, Zimbabwe