मुंबई, 9 फेब्रुवारी: T20 क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड केलेल्या ख्रिस गेलची (Chris Gayle) बॅट बराच काळापासून शांत होती. गेल आता 42 वर्षांचा आहे. त्यानं आगामी आयपीएल सिझनमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तो सध्या वेस्ट इंडिज क्रिकेटकडून मैदानात निरोप कधी मिळतो याची वाट पाहत आहे. गेलच्या खराब फॉर्मवर अनेक दिवसांपासून टीका होत आहे. पण, आपण अजूनही संपलेलो नसल्याचं गेलनं दाखवून दिलं आहे.
बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) स्पर्धेत गेल फॉर्च्यून बरिशलकडून (Fortune Bairshal) खेळत आहे. त्याने सिल्हेट सनरायझर्स विरूद्ध (Sylhet Sunrisers) दमदार अर्धशतक झळकावलेलं आहे. पहिल्यांदा बॅटींगसाठी उतरलेल्या बारिशलकडून ख्रिस गेल आणि मुनीम शहरयार यांनी पहिल्या विकेटसाठी 72 रनची भागिदारी केली. शहरायारनं 28 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 6 फोरसह 51 रन काढले. तो आऊट झाल्यानंतर गेलनं आक्रमक खेळ केला.
गेलनं 45 बॉलमध्ये 52 रनची खेळी केली. त्याचबरोबर तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. या खेळीत गेलनं 4 फोर आणि 2 सिक्स लगावले. याचाच अर्थ त्याने फक्त 6 बॉलमध्ये 28 रन काढले. बारिशलकडून कॅप्टन शाकिब अल हसननं 19 बॉलमध्ये 38 रनची खेळी केली. या तिघांच्या दमदार खेळामुळे बारिशननं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 4 आऊट 199 रन केले.
सिल्हेट सनरायझर्सकडून 49 बॉलमध्ये 90 रन करत या 200 रनच्या टार्गेटचा पाठलाग करण्याचा जोरदा प्रयत्न केला. पण, त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. सिल्हेटनं 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 187 रन केले. त्यामुळे त्यांचा 12 रननं पराभव झाला. आक्रमक 38 रन आणि नंतर 2 विकेट्स घेणाऱ्या शाकिब अल हसनचा 'प्लेयर ऑफ द सीरिज' म्हणून गौरव करण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bangladesh, Chris gayle, Cricket, Cricket news, Sports, T20 cricket