जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / BAN vs NZ : व्हॉलीबॉल खेळता-खेळता बनला क्रिकेटपटू! ऐतिहासिक विजयाचा ठरला शिल्पकार

BAN vs NZ : व्हॉलीबॉल खेळता-खेळता बनला क्रिकेटपटू! ऐतिहासिक विजयाचा ठरला शिल्पकार

BAN vs NZ : व्हॉलीबॉल खेळता-खेळता बनला क्रिकेटपटू! ऐतिहासिक विजयाचा ठरला शिल्पकार

बांगलादेश क्रिकेट टीमच्या इतिहासात 5 जानेवारी 2022 हा दिवस नेहमी लक्षात ठेवला जाईल. या दिवशी या टीमनं टेस्टमधील सर्वात मोठा विजय मिळवला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 नोव्हेंबर : बांगलादेश क्रिकेट टीमच्या इतिहासात 5 जानेवारी 2022 हा दिवस नेहमी लक्षात ठेवला जाईल. या दिवशी या टीमनं टेस्टमधील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. बांगलादेशनं टेस्टमधील वर्ल्ड चॅम्पियनला (Bangladesh vs New Zealand) त्यांच्यात घरात 8 विकेट्सनं पराभूत केले आहे. बांगलादेशचा न्यूझीलंडमधील हा पहिलाच विजय आहे. फास्ट बॉलर इबादत हुसेन (Ebadot Hossain) या विजयाचा हिरो ठरला. त्याने दुसऱ्या इनिंगमध्ये 6 विकेट्स  घेत बांगलादेशच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. दोन वर्षांपूर्वी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या इबादतचा यापूर्वीचा रेकॉर्ड खास नाही. त्याची 10 मॅचमधील सरासरी 81.24 होती. या टेस्टमध्ये एकूण 7 विकेट्स घेत हुसेननं त्याची सरासरी आणि स्ट्राईक रेट दोन्हीमध्येही सुधारणा केली आहे. आता हुसेनचा स्ट्रईक रेट 56.55 आहे.

जाहिरात

टॅलेंट हंटमधून टीममध्ये दाखल इबादतचा बांगलादेशच्या टीममध्ये दाखल होण्यापर्यंतचा प्रवास मोठा रंजक आहे. तो क्रिकेटपटू होण्यापूर्वी एअरफोर्सच्या टीममध्ये व्हॉलीबॉल खेळत असे. ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर इबादत ब्रेट ली ची बॉलिंग पाहून प्रभावित झाला. त्यानंतर त्याचपद्धतीचा फास्ट बॉलर होण्याचे त्याचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 2016 साली तो फरीदपूरमध्ये फास्ट बॉलर्ससाठी झालेल्या टॅलेंट हंटमध्ये सहभागी झाला. या टॅलेंट हंटमधील टॉप 3 बॉलरपैकी तो होता. त्यानंतर इबादतला ढाकामधील ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आले. त्याने या ट्रेनिंगमध्ये बॉलिंग कन्सल्टंट अकीब जावेदला प्रभावित केले. त्यानंतर त्याने बांगलादेश प्रीमियर  लीग (BPL) आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2018-19 च्या देशांतर्गत सिझनमध्ये त्याने 21 विकेट्स घेतल्या. कोहली-रहाणेला जमत नाही ते बांगलादेशनं करून दाखवलं! टीम इंडियाची प्रतीक्षा कायम इबादतनं 2019 साली बीपीएलमध्येही प्रभावित केले. त्यानंतर टस्कीन अहमद जखमी झाल्यानं त्याची बांगलादेशच्या टीममध्ये निवड झाली. इबादतनं 2019 साली न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये पदार्पण केले होते. तीन वर्षांनी त्यानं याच टीमच्या विरुद्ध बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात