Home /News /sport /

BAN vs NZ : वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडला बांगलादेशचा धक्का, पहिल्या टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय

BAN vs NZ : वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडला बांगलादेशचा धक्का, पहिल्या टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय

बांगलादेशनं न्यूझीलंड विरुद्धची पहिली टेस्ट (Bangladesh vs New Zealand) 8 विकेट्सनं जिंकत इतिहास रचला आहे.

    मुंबई, 5 जानेवारी : बांगलादेशनं न्यूझीलंड विरुद्धची पहिली टेस्ट (Bangladesh vs New Zealand) 8 विकेट्सनं जिंकत इतिहास रचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) पहिल्या सिझनची विजेता असलेली न्यूझीलंडची टीम 5 वर्ष आणि 17 टेस्टनंतर पहिल्यांदाच घरच्या मैदानावर एखादी टेस्ट हरली आहे. इतकंच नाही तर बांगलादेशचा हा न्यूझीलंडच्या जमिनीवर कोणत्याही प्रकारातील हा पहिलाच विजय आहे. इबादत हुसेन (Ebadot Hossain) हा बांगलादेशच्या या ऐतिहासिक विजयाचा हिरो ठरला. त्याने दुसऱ्या इनिंदमध्ये 6 विकेट्स घेतल्या. पहिल्या टेस्टच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडची टीम 169 रनवर संपुष्टात आली. बांगलादेशनं विजयासाठी आवश्यक असलेले 40 रन 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. 40 रनच्या टार्गेटचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरूवात खराब झाली. दुसऱ्याच ओव्हरमध्ये शादमान इस्लामला (3) टीम साऊदीनं आऊट केलं. त्यानंतर काईल जेमीसनननं नजमूल शंटो (17) याला आऊट करत बांगलादेशला दुसरा धक्का दिला. त्यानंतर मोमीनुल हक (नाबाद 13) आणि मुशफिकूर रहीम (नाबाद 5) यांनी आणखी नुकसान होऊ न देता बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पाचव्या दिवशी सकाळी न्यूझीलंडनं 5 आऊट 147 रनपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. इबादत हुसेननं खेळ सुरू होताच रॉस टेलरला (40) आऊट केले. त्यानंतर न्यूझीलंडची घसरगुंडी उडाली. न्यूझीलंडनं शेवटच्या 5 विकेट्स फक्त 16 रनमध्ये गमावल्या.  बांगलादेशकडून इबादतनं 6, टस्कीन अहमदनं 3 तर मेहदी हसननं 1 विकेट घेतली. न्यूझीलंडची दुसरी इनिंग 169 रनवर संपुष्टात आली. शार्दुल ठाकूर वॉन्डरर्सचा 'लॉर्ड', कुंबळे-श्रीनाथलाही टाकलं मागे बांगलादेशनं यापूर्वी न्यूझीलंडमध्ये क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात 34 सामने खेळले होते. त्यामध्ये फक्त एक वेळा स्कॉटलंड विरूद्ध त्यांनी विजय मिळवला होता. न्यूझीलंड विरुद्ध न्यूझीलंडमध्ये त्यांचा हा पहिलाच विजय आहे. या मॅचमध्ये शाकीब अल हसन, तमिम इक्बाल आणि महमुदुल्लाह हे अनुभवी खेळाडू नव्हते. त्यानंतरही बांगलादेशनं ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bangladesh cricket team, Cricket, New zealand

    पुढील बातम्या