29 मार्च : चेंडू कुरतडल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीवन स्मिथनं पत्रकार परिषदेत सगळ्या क्रीडाप्रेमींची माफी मागितली. बोलताना भावना अनावर झाल्याने डोळ्यातून अनेकवेळा त्याच्या पाणी आलं आणि आपण भयंकर मोठी चूक केल्याचं त्यानं मान्य केलं. कर्णधार म्हणून आपण चुकीचा निर्णय घेतल्याचं तो म्हणाला. माझं क्रिकेटवर प्रेम असून यातून बाहेर पडू असा विश्वास त्यानं व्यक्त केला. हे आपल्या कर्णधारपदाचं अपयश असल्याचंही तो म्हणाला.
#WATCH Steve Smith says, 'there was a failure of leadership, of my leadership', breaks down as he addresses the media in Sydney. #BallTamperingRow pic.twitter.com/hXKB4e7DR2
— ANI (@ANI) March 29, 2018
स्मिथनं रडत रडत अख्ख्या आॅस्ट्रेलियाची माफी मागितली. तो म्हणाला, 'मला फाॅलो करणाऱ्या मुलांचीही मी माफी मागतोय. माझ्या हातून पुन्हा असं होणार नाही.'
स्टीवन स्मिथ आणि वॉर्नरवर एक वर्षाची बंदी घातली गेलीय. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं हा निर्णय घेतलाय. एक वर्ष दोघांनाही खेळता येणार नाही. त्याचबरोबर दोन वर्ष हे खेळाडू कप्तानपदही भुषवू शकणार नाहीत. बेनक्राॅफ्टवरही 9 महिन्यांची बंदी घातलीय. हे तीनही खेळाडू याविरोधात अपिल करू शकतात. त्यासाठी त्यांना 7 दिवसांचा अवधी दिला गेलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Cricket, Steven smith, आॅस्ट्रेलिया, क्रिकेट, स्टीवन स्मिथ