Home /News /sport /

'माझ्या पत्नीला शिव्या देणे बंद करा', WBBL विजेत्या महिला खेळाडूनं सुनावलं

'माझ्या पत्नीला शिव्या देणे बंद करा', WBBL विजेत्या महिला खेळाडूनं सुनावलं

दक्षिण आफ्रिकेची स्टार महिला खेळाडू मारिजाने कापच्या (Marizanne Kapp) पत्नीला सोशल मीडियावर शिवीगाळ केली जात आहे.

    मुंबई, 29 नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिकेची स्टार खेळाडू मारिजाने कापच्या (Marizanne Kapp) दमदार बॅटींगमुळे पर्थ स्कॉचर्स (Perth Scorchers) टीमनं ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीग (WBBL) स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे. 23 बॉलमध्ये 31 रन आणि 1 विकेट घेणारी काप 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरली. या मॅचनंतर कापनं तिच्या पत्नीबद्दल सोशल मीडियावर अपशब्द वापरणाऱ्या ट्रोलर्सला सुनावले आहे. कापची पत्नी ऑल राऊंडर डेन वॅन निकेर्क  (Dane van Niekerk)  ही फायनल मॅचमध्ये पराभूत झालेल्या अ‍ॅडलेड स्ट्राईकर्स टीमची सदस्य होती. डेन फायनलमध्ये अपयशी ठरली. ती 13 बॉलमध्ये फक्त 6 रन काढून आऊट झाली. या खेळीनंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. डेनला सोशल मीडियावर येत असलेल्या प्रतिक्रियांचा स्क्रीनशॉट कापनं शेअर केला आहे. 'हे बरोबर नाही. खेळाडूंना शिव्या देणे बंद करा. आम्ही देखील मनूष्य आहोत. माझी पत्नी डेनला शिव्या देणे थांबवा. फ्लॉप कामगिरीनंतर मिळत असलेल्या खराब वागणुकीमुळे आम्ही आजारी पडलेलो असून खूप थकलो आहोत.' अशी प्रतिक्रिया कापने दिली आहे. काप आणि डेन या दोघीही दक्षिण आफ्रिका टीमच्या सदस्य आहेत.त्यांनी 2018 साली सहकारी खेळाडू आणि कुटुंबाच्या उपस्थितीमध्ये लग्न केले होते. फायनल मॅचमध्ये पर्थनं पहिल्यांदा बॅटींग करत 5 आऊट 146 रन काढले होते. 147 रनचा पाठला करण्यासाठी उतरलेली अ‍ॅडलेडची टीम निर्धारित ओव्हर्समध्ये 134 रन करू शकली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news

    पुढील बातम्या