मुंबई, 15 मे : भारत सध्या कोरोना व्हायरसच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. या कसोटीच्या प्रसंगी अनेकांनी कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये विशेषत: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा समावेश आहे. त्यांनी आर्थिक मदत करण्याबरोबरच भारतीयांना उभारी देण्याचा प्रयत्न केलाय. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या या यादीत माजी ओपनिंग बॅट्समन मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) याचाही समावेश झाला आहे. हेडननं भारताच्या परिस्थितीबाबत एक भावुक ब्लॉग लिहिला आहे.
हेडननं या ब्लॉगमध्ये लिहलंय, "भारत सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट सहन करत आहे. भारत या व्हायरसचा शर्थीनं सामना करतोय. त्याचवेळी जगभरातील मीडिया 140 कोटींच्या या देशावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. ही महामारीची वेळ आहे. मी गेल्या एक दशकांपासून भारतामध्ये फिरलोय. विशेषत: तामिळनाडूला मी माझं 'आध्यात्मिक घर' समजतो. हा विशाल देश चालवण्याची जबाबदारी ज्या नेत्यांवर आणि सरकारी अधिकाऱ्यांवर आहे, त्यांच्याबद्दल मला नेहमीच आदर वाटतो.''
'मी भारताचा ऋणी'
ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज बॅट्समननं पुढं लिहलंय की, "मी भारतामध्ये गेलो त्या सर्व ठिकाणी लोकांनी माझ्यावर भरपूर प्रेम केलं. त्यासाठी मी नेहमीच ऋणी असेल. मी अत्यंत अभिमानानं आणि खात्रीपूर्वक सांगू शकतो की, गेल्या काही वर्षांमध्ये मी भारताला अत्यंत जवळून बघितलं आहे. त्यामुळेच या बिकट परिस्थितीमध्ये भारताबद्दल जे खराब लिहलं जातंय ते वाचून मला रडू येतंय. मी हे खात्रीपूर्वक सांगू शकतो की, भारताबद्दल या पद्धतीचं लिहणाऱ्या लोकांपैकी एखाद्यानंच या देशाची समस्या आणि लोकांबद्दल समजून घेतलं आहे.
सध्या जग भारतासाठी दरवाजे बंद करत आहे. त्यावेळी मी भारतामध्ये राहून या देशाबद्दलचे विचार मांडण्याचं ठरवलं. हजारो मैल दूर बसलेल्या लोकांना हे समजणार नाही.''
महेंद्रसिंह धोनीच्या 10 वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ शॉटवर बटलर आजही फिदा, म्हणाला....
उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी हेडनचा हा ब्लॉग सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Extracts from a heartfelt blog on India by @HaydosTweets A cricketer whose heart is even bigger than his towering physical stature. Thank you for the empathy and your affection... pic.twitter.com/h671mKYJkG
— anand mahindra (@anandmahindra) May 14, 2021
'एक असा क्रिकेटपटू ज्याचं ऱ्हदय त्याच्या उंचीपेक्षाही मोठं आहे. मित्रा, तुझ्या प्रेमाबद्दल आभारी आहे.' हेडन चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) आयपीएल स्पर्धा खेळला आहे. त्याचबरोबर तो आयपीएल 2021 च्या दरम्यान 'स्टार स्पोर्ट्स' च्या कॉमेंट्री पॅनलचा देखील सदस्य होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Coronavirus, Cricket, Social media, Viral post