2007 मधील T20 वर्ल्ड कप किंवा 2011 मधील वन-डे वर्ल्ड कप युवराज सिंहच्या योगदानाशिवाय टीम इंडियाला जिंकणे शक्य नव्हते. युवराजने त्याच्या कारकिर्दीमध्ये एकूण 4 वर्ल्ड कप जिंकले आहेत. यामधील अंडर 19, टी20 आणि वन-डे वर्ल्ड कपबद्दल तर सर्वांना माहिती आहे. पण, युवराजने अंडर 16 वर्ल्ड कप स्पर्धेचंही विजेतेपद पटकावले आहे. (फाईल फोटो)
भारतीय उपखंडात 2011 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंह 'प्लेयर ऑफ द टुर्नामेंट' ठरला. त्याने संपूर्ण स्पर्धेत 90 पेक्षा जास्त सरासरीनं 362 रन केले. त्याचबरोबर 15 विकेट्स घेतल्या. याच स्पर्धेत युवराजला कॅन्सरची चाहूल लागली होती. पण, त्याने कुणालाही याची कल्पना येऊ दिली नाही. (फाईल फोटो)