advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2021 : अर्जुन तेंडुलकरच नाही, या दिग्गज क्रिकेटपटूंची मुलंही खेळली आयपीएल

IPL 2021 : अर्जुन तेंडुलकरच नाही, या दिग्गज क्रिकेटपटूंची मुलंही खेळली आयपीएल

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) चा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने आयपीएल 2021 (IPL 2021 Auction) च्या लिलावासाठी नावाची नोंदणी केली आहे.

01
भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने आयपीएल 2021 च्या लिलावासाठी नावाची नोंदणी केली आहे. अर्जुनने 2018 साली अंडर-19 युथ टेस्टमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं, तसंच यावर्षी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून त्याने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं. हरियाणाविरुद्धच्या मॅचमधून अर्जुनने मुंबईकडून पदार्पण केलं. त्यामुळे 21 वर्षांचा अर्जुन आयपीएल लिलावासाठी क्वालिफाय झाला आहे. 18 फेब्रुवारीला अर्जुन तेंडुलकरवर बोली लागेल. आयपीएलमध्ये खेळणारा अर्जुन हा काही पहिलाच स्टार किड नाही. (Arjun Tendulkar/Instagram)

02
भारतीय क्रिकेटपटू रॉजर बिनी यांचा मुलगा स्टुअर्ट बिनी आयपीएलमध्ये खेळला. 2014 सालच्या लिलावाआधी स्टुअर्ट बिनीला राजस्थान रॉयल्सने रिटेन केलं होतं. आयपीएलमध्ये स्टुअर्ट राजस्थान, मुंबई आणि बँगलोरकडून खेळला. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत 880 रन केले आणि 22 विकेट घेतल्या. 2020 सालच्या लिलावात त्याला कोणीही विकत घेतलं नाही. यावर्षी कोणीतरी बोली लावेल, अशी स्टुअर्ट बिनीची अपेक्षा आहे. (Stuart Binny/Instagram)

03
आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये स्थान पटकावलेले भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा मुलगा रोहन गावसकरही आयपीएलमध्ये खेळला. 2009 सालच्या आयपीएलमध्ये रोहन कोलकात्याच्या टीममध्ये होता. केकेआरने त्याला फक्त 2 मॅचमध्येच खेळण्याची संधी दिली. आता रोहन गावसकर कॉमेंट्री करताना दिसतो. रोहनने भारताकडून 2004 साली 11 वनडेही खेळल्या. (Rohan Gavaskar/Instagram)

04
आयपीएल इतिहासातील सगळ्यात महाग खेळाडू ठरलेला युवराज सिंग भारताचे माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांचा मुलगा आहे. युवराज लागोपाठ 10 वर्ष आयपीएल खेळला. यातल्या दोनवेळा त्याच्यावर सर्वाधिक बोली लागली. युवराजने पंजाबकडून आयपीएल खेळायला सुरूवात केली. यांतर 2014 साली त्याला बँगलोरने विकत घेतलं. 2015 साली त्याला दिल्लीने 16 कोटी रुपयांना विकत घेतलं. 2016-17 साली युवराज हैदराबादकडून खेळला, यानंतर 2018 साली तो पुन्हा पंजाबच्या टीममध्ये आला. 2019 साली मुंबईकडून खेळल्यानंतर त्याची कारकीर्द संपुष्टात आली. (Yuvraj Singh/Instagram)

05
आयपीएलच्या पहिल्याच मोसमात पंजाबकडून खेळताना शॉन मार्शने धडाकेबाज कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू रॉड मार्श यांचा तो मुलगा आहे. आयपीएलच्या पहिल्याच मोसमात शॉन मार्शने 11 मॅचमध्ये 616 रन केले. एकाच फ्रॅन्चायजीकडून त्याने 2,477 रन केले. आता त्याचं आयपीएलमध्ये पुनरागमन होण्याची शक्यता कमी आहे. (Shaun Marsh/Instagram)

06
शॉन मार्शचा छोटा भाऊ मिचेल मार्शही आयपीएलमध्ये खेळतो. 2010 साली मिचेल मार्शने आयपीएलमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून मिचेलने फक्त 21 मॅच खेळल्या, यात त्याने 225 रन केले आणि 20 विकेट घेतल्या. 2021 सालच्या मोसमासाठी हैदराबादने मिचेल मार्शला रिटेन केलं आहे. हैदराबादशिवाय मिचेल मार्श रायजिंग पुणे, डेक्कन चार्जर्स आणि पुणे वॉरियर्सकडूनही खेळला. (Mitchell Marsh/Instagram)

07
क्रिस श्रीकांत यांचा मुलगा अनिरुद्ध श्रीकांत याने 2003-04 साली तामीळनाडूकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 2008 ते 2013 या कालावधीमध्ये अनिरुद्ध चेन्नई सुपरकिंग्जच्या टीममध्ये होता. 2014 साली त्याला हैदराबादने विकत घेतलं. अनिरुद्ध चेन्नईसोबतच्या 7 मोसमात 19 मॅच खेळला, यात त्याने 123.14 च्या स्ट्राईक रेटने 133 रनही केले. यादरम्यान त्याला मॅन ऑफ द मॅचही मिळालं. हैदराबादकडून खेळताना अनिरुद्धला फक्त एकाच मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली, ज्यात त्याने 3 रन केले. (IPLT20.com/Screengrab)

  • FIRST PUBLISHED :
  • भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने आयपीएल 2021 च्या लिलावासाठी नावाची नोंदणी केली आहे. अर्जुनने 2018 साली अंडर-19 युथ टेस्टमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं, तसंच यावर्षी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून त्याने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं. हरियाणाविरुद्धच्या मॅचमधून अर्जुनने मुंबईकडून पदार्पण केलं. त्यामुळे 21 वर्षांचा अर्जुन आयपीएल लिलावासाठी क्वालिफाय झाला आहे. 18 फेब्रुवारीला अर्जुन तेंडुलकरवर बोली लागेल. आयपीएलमध्ये खेळणारा अर्जुन हा काही पहिलाच स्टार किड नाही. (Arjun Tendulkar/Instagram)

    MORE
    GALLERIES