मुंबई, 30 जुलै : टीम इंडियाचा क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) आणि चित्रपट अभिनेता सुनील शेट्टीची (Sunil Shetty) मुलगी आथिया शेट्टी (Athiya Shetty) यांच्या नात्याची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. या दोघांनी याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिनं नुकताच एक फोटो शेअर केला असून या फोटोमुळे राहुल आणि आथियाच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जात आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिली टेस्ट 4 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या टेस्टपूर्वी टीम इंडियाचे खेळाडू त्यांच्या कुटुंबासोबत मजा करत आहेत.
अनुष्कानं एक ताजा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या फोटोला तिनं 'डर 'हम' साथ साथ है' असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोमध्ये विराट कोहली, उमेश यादव आणि इशांत शर्मा त्यांच्या पत्नीसोबत दिसत आहेत. मात्र या सर्वांपेक्षा अधिक लक्ष केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांनी वेधून घेतलं आहे. या दोघांची चांगलीच जवळीक या फोटोत दिसली आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी इशांत शर्माची (Ishant Sharma) पत्नी प्रतिमा सिंग हिनेही एक फोटो शेयर केला होता. या फोटोमध्ये राहुल आणि आथिया शेट्टी एकत्र दिसले होते. आथिया शेट्टी ही आपली पार्टनर असल्याची माहिती केएल राहुलनं बीसीसीआयला दिली इंग्लंड दौऱ्यावर दिली होती.
भारतीय टीममधील बहुतेक खेळाडू त्यांच्या कुटुंबीयांसोबत इंग्लंड दौऱ्यावर बीसीसीआयनं तयार केलेल्या बायो-बबलमध्ये राहत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी (WTC Final) इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयनं सर्व खेळाडूंकडे त्यांच्या कुटुंबीयांची माहिती मागितली होती. त्यावेळी राहुलनं आथिया आपली पार्टनर असल्याची माहिती बीसीसीआयला कळवली होती.
Tokyo Olympics: पीव्ही सिंधूची सेमी फायनलमध्ये धडक, मेडलसाठी हवा फक्त एक विजय
या सर्व घटनांच्या पाठोपाठ आता अनुष्का शर्मानंही राहुल आणि आथियाचा एकत्र फोटो शेअर केल्यानं त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma, Instagram, Kl rahul, Photo viral