मुंबई, 23 डिसेंबर : संपूर्ण प्रतिस्पर्धी टीम एकट्यानं आऊट केल्यानंतरही पुढच्या मॅचमधून टीममधून हकालपट्टी होण्याची दुर्दैवी वेळ न्यूझीलंडचा स्पिनर एजाझ पटेलवर (Ajaz Patel) आली आहे. एजाझनं मुंबई टेस्टमध्ये एकाच इनिंगमध्ये 10 विकेट्स घेतल्या होत्या. भारताविरुद्ध मागील महिन्यात झालेल्या या टेस्टमध्ये त्याने पहिल्या इनिंगमध्ये 10 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 4 अशा एकूण 14 विकेट्स घेतल्या. एकाच इनिंगमध्ये 10 विकेट्स घेणारा तो क्रिकेट विश्वातील फक्त तिसराच बॉलर आहे. त्यानंतरही बांगलादेश विरुद्धच्या टीममध्ये त्याला जागा मिळालेली नाही. ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर पुढच्याच मॅचसाठी टीममध्ये जागा न मिळालेला एजाझ हा पहिलाच क्रिकेटपटू नाही. करूण नायर (Karun Nair), अँडी सँधम आणि जेसन गिलेस्पी (Jason Gillespie) या खेळाडूंनाही हे सहन करावं लागलं आहे. यापैकी अँडी सँथम हे सर्वात दुर्दैवी ठरले. 1930 साली जॅक हॉब्ज आणि हार्बट सटफ्लिक हे इंग्लंडचे दोन्ही ओपनर जखमी झाल्यानं त्यांना टेस्टमध्ये संधी मिळाली. त्या टेस्टमध्ये सँथम यांनी जबरदस्त कामगिरी केली. त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये 330 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 50 रन केले. एकाच टेस्टमध्ये 375 रन काढल्यानंतरही त्यांना टीममधून वगळण्यात आले. निवड समितीनं त्यांच्याकडे नंतर साफ दुर्लक्ष केले. सँथम त्यानंतर पुन्हा कधीही टेस्ट क्रिकेट खेळले नाहीत. ऑस्ट्रेलियन खेळाडूनं भर मैदानात केलं सहकाऱ्याला KISS, पाहा VIDEO ऑस्ट्रेलियाच्या जेसन गिलेस्पी देखील दुर्दैवी ठरला. फास्ट बॉलर असलेला गिलेस्पी लोअर ऑर्डरमध्ये चांगली बॅटींग करत असते. त्याने शेवटची टेस्ट मॅच 2006 साली बांगलादेश विरुद्ध खेळली. गिलेस्पनीनं त्या टेस्टमध्ये नाबाद 201 रनची खेळी केली. पण, त्यानंतरही ऑस्ट्रेलिया टीममधून त्याला वगळण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







