Home /News /sport /

राशिद खाननं बॅटनं नाही तर गोल्फ स्टिकनं लगावला हेलिकॉप्टर शॉट, VIDEO पाहून व्हाल थक्क

राशिद खाननं बॅटनं नाही तर गोल्फ स्टिकनं लगावला हेलिकॉप्टर शॉट, VIDEO पाहून व्हाल थक्क

अफगाणिस्तानचा स्पिनर राशिद खान (Rashid Khan) क्रिकेट विश्वातील प्रभावशाली स्पिनर आहे. राशिदनं क्रिकेटच्या मैदानात यापूर्वी अनेकदा फटकेबाजी केली आहे.

  मुंबई, 5 जुलै: अफगाणिस्तानचा स्पिनर राशिद खान (Rashid Khan) क्रिकेट विश्वातील प्रभावशाली स्पिनर आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून (SRH) खेळणाऱ्या राशिदच्या तालावर नाचताना अनेक क्रिकेटपटूंना आपण पाहिले आहे. आयपीएलच नाही तर जगातील सर्व टी20 लीगमध्ये राशिदनं ठसा उमटवला आहे. राशिद खान त्याच्या घातक स्पिन बॉलिंगप्रमाणेच आक्रमक बॅटींगसाठी देखील प्रसिद्ध आहे. राशिदनं क्रिकेटच्या मैदानात यापूर्वी अनेकदा फटकेबाजी केली आहे. महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) खास फटका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टर शॉटही राशिदनं यापूर्वी लगावला आहे. त्याने नुकताच बॅटनं नाही तर गोल्फ स्टिकनं हा शॉट लगावला आहे. राशिद खाननं त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने गोल्फ स्टिकनं हेलिकॉप्टर शॉट लगावला आहे. राशिदचा हा शॉट बराच दूर गेला होता. कधी गोल्फमध्ये हेलिकॉप्टर शॉट लावण्याचा प्रयत्न केला आहे का? असा प्रश्न राशिदनं यावेळी विचारला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral) झाला आहे. इंग्लंडचा माजी कॅप्टन केविन पीटरसनसह अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Rashid Khan (@rashid.khan19)

  IND vs ENG: ‘लोकांना खूश करणे माझं काम नाही’, टीम इंडियाच्या कॅप्टननं खडसावलं राशिद खाननं आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सिझनमध्ये (IPL 2021) 7 मॅचमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. या सिझनमधील त्याचा इकॉनॉमी रेट 6.14 आहे. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे ही स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. ही टीम पॉईंट टेबलमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. आयपीएल स्पर्धेतील उर्वरित 31 सामने यूएईमध्ये होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात या सामन्यांना सुरुवात होईल.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket news, Instagram, Video viral

  पुढील बातम्या