मुंबई, 5 डिसेंबर: कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार (KKR) ऑल राऊंडर आंद्रे रसेलच्या (Andre Russell) जबरदस्त खेळीमुळे डेक्कन ग्लॅडिएटर्सने (Deccan Gladiators) पहिल्यांदाच अबू धाबी टी10 लीग (Abu Dhabi T10 League) स्पर्धेचे विजेतेपद पटाकवले आहे. डेक्कननं फायनलमध्ये दिल्ली बुल्स (Delhi Bulls) 56 रननं पराभव केला. आयपीएल आणि टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत दुखापत आणि खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या रसेलनं फायनलमध्ये कमाल केली. त्यानं त्याच्या स्टाईलनं फटकेबाजी करत नाबाद 90 रन काढले. रसेलनं ही खेळी करण्यासाठी फक्त 32 बॉल घेतले. दिल्लीच्या बॉलर्सची धुलाई करत त्यानं या खेळीत 3 फोर आणि 5 सिक्स लगावले. केकेआरच्या टीममध्ये फिनिशर्सचं काम करणारा रसेल फायनलमध्ये ओपनिंगला आला होता. त्याने टॉम कोलहर कॅडमोरसोबत पहिल्या विकेटसाठी 159 रनची नाबाद भागिदारी केली. फायनल मॅचमधील ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून रसेलचीच निवड झाली. तर श्रीलंकेचा स्पिनर वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) ‘मॅन ऑफ द सीरिज’ ठरला.
Congratulations @TeamDGladiators! 👏
— T10 Global (@T10League) December 4, 2021
Deserved winners 👊#AbuDhabiT10 #InAbuDhabi #CricketsFastestFormat pic.twitter.com/HEXSNuWIcr
160 रन्सचा पाठलाग करताना दिल्लीकडून हेमराजनं प्रतिकार केला. त्यानं रसेलच्या 5 व्या ओव्हर्समध्ये 2 फोर आणि 1 सिक्स लगावला. त्यानंतर हसरंगाच्या पुढच्या ओव्हर्समध्ये सलग 2 सिक्स मारले. हेमराजनं 20 बॉलमध्ये 2 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीनं 42 रन काढले. वेगानं खेळण्याच्या नादात तो हसरंगाच्या बॉलिंगवर आऊट झाला. त्यानंतर दिल्लीच्या एकाही बॅटरला मोठा स्कोअर करता आला नाही. IND vs NZ: शुभमन गिलचं कौतुक करत सचिन म्हणतो, ‘आता ती वेळ आली आहे’ दिल्ली बुल्सनं निर्धारित 10 ओव्हर्समध्ये 7 आऊट 103 पर्यंत मजल मारली. डेक्कनकडून हसरंगा, ओडियन स्मिथ आणि टायमल मिल्स यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.