चेन्नई, 16 एप्रिल: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसाठी (Virat Kohli) भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिज (India vs England Test Series 2021) साधरण ठरली होती. विराटनं चार टेस्टमध्ये 28.66 च्या सरासरीनं फक्त 172 रन काढले होते. त्यानंतरच्या 5 टी 20 च्या सीरिजमध्ये विराटनं 115.50 च्या सरासरीनं 231 रन काढले. या बदललेल्या फॉर्मचं श्रेय विराटनं त्याचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीममधील सहकारी एबी डीव्हिलियर्स (AB de Villiers) याला दिले होते. डीव्हिलियर्सनं मॅचपूर्वी दिलेला सल्ला उपयोगी ठरला असं विराटनं सांगितलं होतं. आरसीबीनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन डीव्हिलियर्सच्या मुलाखतीचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यानं विराटला काय मेसेज केला होता हे सांगितलं आहे. “मला हे सांगण्याची इच्छा नाही. आम्ही चार मुद्यांवर चर्चा केली. त्याचबरोबर खेळाशी निगडीत काही तांत्रिक आणि बेसिक गोष्टींवरही बोललो,” असं डीव्हिलियर्सनं सुरुवातीला स्पष्ट केलं. " मला त्याला या गोष्टी काही दिवसांपासून सांगायच्या होत्या. मी त्याचा (विराट) खेळ काही महिन्यांपासून पाहत होतो. तो बॅटींग करताना खूप गंभीर वाटला. त्यामुळे त्याचा मेसेज आला, त्यावेळी मला आश्चर्य वाटलं नाही. त्याला काही बेसिक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, हे मला लगेच समजलं." असं डीव्हिलियर्सनं सांगितलं. या सर्व प्रस्तावनेनंतर डीव्हिलियर्सनं त्याच्या खिशातील मोबाईल काढून विराटला पाठवलेले चार पॉईंट्स वाचून दाखवले. “बॉल पाहा. डोकं स्थिर ठेव. बॉल तुझ्या टप्प्यात येऊ दे, बॉडी लँग्वेज आणि विचारपद्धती” हे चार पॉईंट्स मी त्याला पाठवले. त्यानंतर आम्ही या चार मुद्यांवर चर्चा केली, असं उत्तर डीव्हिलियर्सनं दिलं.
Bold Diaries: AB de Villiers interview Part 2
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 16, 2021
AB de Villiers talks about the message he sent to Virat Kohli during the India England series, the youngsters who have impressed him at RCB, and much more on @myntra presents Bold Diaries.#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/m9XMGpefqg
एबी डिव्हिलियर्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! पण विराटचं टेन्शन वाढणार आरसीबीच्या टीममध्ये यंदा अनेक सीनियर खेळाडू असून त्यामुळे जबाबदारीचं विभाजन होतं. तसंच टीममधील नव्या खेळाडूंमध्येही भरपूर गुणवत्ता असल्याचं त्यानं सांगितलं. आरसीबीचा तरुण बॅट्समन रजत पाटीदारचा त्यानं या मुलाखतीच्या दरम्यान उल्लेख केला.