जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पाकिस्तानची टीम भारतात खेळण्यासाठी येणार, लिहून घ्या! क्रिकेटपटूनं केलं जाहीर

पाकिस्तानची टीम भारतात खेळण्यासाठी येणार, लिहून घ्या! क्रिकेटपटूनं केलं जाहीर

पाकिस्तानची टीम भारतात खेळण्यासाठी येणार, लिहून घ्या! क्रिकेटपटूनं केलं जाहीर

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील संबंध सध्या ताणले गेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर क्रिकेटपटूनं या वादात भर पाडणारं वक्तव्य केलं आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 21 ऑक्टोबर : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील  द्विपक्षीय क्रिकेट सीरिज सध्या बंद आहे.  फक्त आयसीसी च्या स्पर्धांमध्येच या दोन्ही देशांच्या क्रिकेट टीम एकमेकांच्या विरुद्ध खेळतात. दोन्ही देशांतील क्रिकेटची मॅच म्हणजे चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच असते. येत्या 23 ऑक्टोबर रोजी दोन्ही देशांच्या टीम ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत समोरासमोर येणार आहेत. पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये पाकिस्तानमध्ये आशिया कप स्पर्धेचं आयोजन होणार आहे. त्याच वर्षी भारतामध्ये वन-डे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. एकमेकांच्या देशात टीम पाठवायच्या की नाही, या प्रश्नावरून सध्या गदारोळ सुरू झाला आहे. या गदारोळादरम्यान भारताचे माजी क्रिकेटर आकाश चोप्रांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. काय म्हणाला आकाश? भारतीय टीम आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही, असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) संतापलं आहे. भारतीय टीम पाकिस्तानमध्ये आली नाही तर आम्हीही वन-डे वर्ल्ड कपसाठी भारतात पाकिस्तानी संघ पाठवणार नाही, अशी भूमिका पीसीबीनं घेतली आहे. आशिया कप जर तिसऱ्या ठिकाणी आयोजित केला तर पीसीबी आशियाई क्रिकेट परिषदेमधूनही (एसीसी) बाहेर पडेल, असा इशारा पाकिस्ताननं दिला आहे. भारत-पाक महामुकाबल्याआधी Googleवर पाहा काय होतंय सर्वात जास्त सर्च? पीसीबीचा इशारा फोल पीसीबीच्या या भूमिकेवर माजी भारतीय क्रिकेटर आकाश चोप्रा यांनी आपल्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात यावंच लागेल. आशिया कपही तिसऱ्या ठिकाणी आयोजित होईल, असं मी लिहून देऊ शकतो.” आयसीसी आणि एसीसीकडून पाकिस्तानला मोठी रक्कम मिळते. त्यामुळे तो वर्ल्ड कपमधून माघार घेऊ शकत नाही, असं आकाशनं सांगितलं …तर पीसीबीचा तोटा “सर्व गोष्टी निश्चित आहेत. भारत नसेल तर आशिया कप होऊ शकत नाही. मग तो बंद केलेलाच बरा. आशिया कप ही वर्ल्ड कपपेक्षा खूपच लहान स्पर्धा आहे. जर, तुम्ही वर्ल्ड कपसारखी स्पर्धा सोडली, तर तुम्हाला आयसीसीकडून मिळणारी मोठी रक्कम विसरावी लागेल. 2023मध्ये आशिया कप आयोजित केला गेला तर तो तटस्थ ठिकाणीच असेल. पुढच्या वर्षी वन-डे वर्ल्ड कप भारतातच होईल आणि सर्व देश खेळायला येतील,” असंही चोप्रा म्हणाले.   ‘हा’ एकटाच टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देईल, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा दावा पाकिस्तानला भारतात यावंच लागेल आकाश चोप्रा म्हणाले, “एसीसीकडून सर्व टीमना फंड मिळतो. मात्र, भारत एसीसीकडून एक रुपयाही घेत नाही. आशियाई क्रिकेटमध्ये भारत आतापर्यंत मोठ्या भावाची भूमिका बजावत आला आहे.  आपली टीम पाकिस्तानात जाणार नाही, असं बीसीसीआयनं म्हटलं आहे तर ही काळ्या दगडावरची रेघ आहे. भारत पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही. मात्र, पाकिस्तानला भारतात यावंच लागेल, असं मी लिहून देऊ शकतो.” दरम्यान, सध्या दोन्ही संघ ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये व्यस्त आहेत. 23 ऑक्टोबर रोजी दोन्ही देशांची मॅच आहे. या मॅचवर सध्या सुरू असलेल्या वादाचा काय परिणाम होतो, याबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात