पहिला चेंडू - गुजरात जायंट्सच्या एश्ले गार्डनरने पहिला चेंडू टाकला. तिने पहिल्या षटकात फक्त २ धावा दिल्या.
पहिला चेंडू खेळणारी यास्तिका भाटिया ही WPL मध्ये बाद होणारी पहिली क्रिकेटर ठरली. ती ८ धावांवर बाद झाली.
पहिली विकेट - गुजरात जायंट्सकडून खेळणाऱ्या तनुजा कनवरने मुंबईच्या यास्तिका भाटियाला वारेहमकरवी झेलबाद केलं.
पहिला षटकार - वेस्ट इंडिजची असलेल्या हिली मॅथ्यूजने मुंबई इंडियन्सकडून खेळताना दुसऱ्याच षटकात षटकार मारला. गुजरातच्या मानसी जोशीने टाकलेला पहिला चेंडू तिने सीमारेषेबाहेर भिरकावला.
पहिलं अर्धशतक - मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीतने एश्ले गार्डनरला १६ व्या षटकात चौकार मारत अर्धशतक पूर्ण केलं.