नवी दिल्ली, 2 डिसेंबर: भारतीय क्रिकेट संघाचा 33 वर्षीय अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) सध्या न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या (IND vs NZ Test) तयारीत व्यस्त आहे. सध्या सुरू असलेल्या सरावादरम्यान त्याने संघातील सहकाऱ्यांसोबतची काही फोटो त्याच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केली आहेत. दरम्यान, त्यातील एक फोटो खास ठरत आहे. तो फोटो म्हणजे पुजाराची मुलगी अदितिचा.
चेतेश्वर पुजाराने काही फोटो आपल्या इंस्टग्राम स्टोरीला शेअर केले आहेत. त्यायादीमध्ये त्याची नन्ही परी अदितीदेखील दिसत आहे. विशेष म्हणजे, अदितीने टेस्ट सिरीजची जर्सी परिधान केली आहे. इतकेच नव्हे तर तिच्या हातमध्ये बॅटदेखील दिसत आहे.
आपल्या मुलीचा हा क्यूट फोटो शेअर करत पुजाराने सुंदर अशी कॅप्शनदेखील दिली आहे. 'छोटी मुलगी आपल्या वडीलांची जर्सी परिधान करुन सज्ज झाली आहे.' असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
तिचा क्यूट फोटो सध्या व्हायरल होत असून, मुलीचे वडिलांच्या पावलावर पाऊल त्यामुळे तिचे भविष्य किती उज्वल आहे हे आत्ताच पाहायला मिळत आहे. अशी चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे.
चेतेश्वर पुजाराने दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2013 मध्ये त्याची गर्लफ्रेंड पूजा पाबरीसोबत लग्न केले. पूजा ही गुजरातमधील जामनगर जिल्ह्यातील रहिवासी होती. त्यांनी मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे. या आनंदाच्या प्रसंगी भारतीय फलंदाजाने सर्व भारतीय खेळाडू आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pujara, Test series