जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / CSKने 7 वाजून 29 मिनिटांनी शेअर केला धोनीचा VIDEO; चाहत्यांची धडधड वाढली

CSKने 7 वाजून 29 मिनिटांनी शेअर केला धोनीचा VIDEO; चाहत्यांची धडधड वाढली

ms dhoni

ms dhoni

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ७ वाजून २९ मिनिटांनीच निवृत्ती जाहीर केली होती, त्यामुळे याच वेळेत सीएसकेने शेअर केलेल्या व्हिडीओने चाहत्यांची धडधड वाढवली होती.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    चेन्नई, 10 मार्च : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सायंकाळी ७ वाजून २९ मिनिटांनी निवृत्तीची घोषणा केली होती. त्यावेळी धोनीने मै पल दो पल का शायर हे गाणं बॅकग्राउंडला असलेला एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात धोनीने लिहिलं होतं की, ७ वाजून २९ मिनिटांपासून मला निवृत्त समजावं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर धोनी आय़पीएलमध्ये खेळताना दिसतोय. चेन्नई सुपर किंग्जने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओसुद्धा ७ वाजून २९ मिनिटांनी शेअर केल्यानं चाहत्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. चेन्नईने व्हिडीओ पोस्ट करताना म्हटलं की, थाला अपडेट ७ वाजून २९ मिनिटे.

    जाहिरात

    चेन्नई सुपर किंग्जने शेअर केलेल्या या व्हिडीओची वेळ आणि त्याच्या कॅप्शनमुळे चाहत्यांची धडधड वाढली. पण जेव्हा व्हिडीओ सुरू केला तेव्हा त्यांना दिलासा मिळाला. व्हिडीओत धोनीच्या आय़पीएलमधील रिटायरमेंटबद्दल काही नसून आगामी हंगामीतील तयारी करताना तो दिसत आहे. या व्हिडीओत धोनी मोठे फटके मारताना दिसत आहे. IND VS AUS : क्रिकेटपटूच्या आईचे निधन, दुसऱ्या दिवशी खेळाडू काळी फित बांधून उतरले मैदानात   धोनीने त्याची ईच्छा व्यक्त करताना म्हटलं होतं की, चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये आयपीएलचा अखेरचा सामना खेळायचा आहे. कोरोनामुळे गेल्या दोन हंगामात धोनी होम ग्राउंडवर खेळला नव्हता. चेन्नईला चार वेळा विजेतेपद मिळवून देणारा धोनी यावेळी खेळाडू म्हणून या लीगमधून निवृत्ती घेईल असं म्हटलं जात आहे. जरी आय़पीएलमधून खेळाडू म्हणून धोनीने निवृत्ती घेतली तरी तो चेन्नईच्या सपोर्ट स्टाफमध्ये मेंटॉर म्हणून असेल असं म्हटलं जात आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: IPL 2023
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात