मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Cheteshwar Pujara: पुजाराच्या बॅटमधून धावांचा पाऊस, रॉयल लंडन वन डे कपमध्ये सलग दुसरं शतक

Cheteshwar Pujara: पुजाराच्या बॅटमधून धावांचा पाऊस, रॉयल लंडन वन डे कपमध्ये सलग दुसरं शतक

चेतेश्वर पुजारा

चेतेश्वर पुजारा

Cheteshwar Pujara: ससेक्सकडून खेळणाऱ्या पुजारानं आज सरेविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. त्यानं 131 चेंडूत 20 चौकार आणि 5 षटकारांसह 174 धावा कुटल्या. शुक्रवारी झालेल्या वॉर्विकशायरविरुद्धच्या सामन्यातही त्यानं 107 धावांची खेळी केली होती.

पुढे वाचा ...
  • Published by:  Siddhesh Kanase
लंडन, 14 ऑगस्ट:  चेतेश्वर पुजारा कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा भक्कम आधारस्तंभ मानला जातो. पण भारताच्या  वन डे आणि टी20 संघात मात्र या शैलीदार फलंदाजाला जागा मिळवता आलेली नाही. पुजारा भारताकडून केवळ पाच वन डे खेळला आहे. तर टी20 संघात त्याची एकदाही निवड झालोली नाही. त्यामुळे पुजाराकडे भारताचा कसोटी स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून पाहिलं जातं. पण सध्या हाच पुजारा इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या रॉयल लंडन वन डे कपमध्ये धावांचा रतीब घालतोय. मर्यादित षटकांच्या या फॉरमॅटमध्ये पुजारानं सलग दोन सामन्यात दोन शतकं ठोकली आहेत. सरेविरुद्ध खणखणीत शतक ससेक्सकडून खेळणाऱ्या पुजारानं आज सरेविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. त्यानं 131 चेंडूत 20 चौकार आणि 5 षटकारांसह 174 धावा कुटल्या. महत्वाचं म्हणजे त्यानं आपलं शतक पूर्ण करण्यासाठी 103 चेंडू घेतले. पण त्यानंतर अवघ्या 28 चेंडूत 74 धावा फटकावल्या. पुजाराची 174 धावांची खेळी ही आतापर्यंत लिस्ट ए क्रिकेटमध्ये ससेक्सच्या फलंदाजानं केलेली सर्वाधिक धावसंख्या ठरली. सरेविरुद्धच्या सामन्याआधी शुक्रवारी ससेक्सचा सामना वॉर्विकशायरशी झाला. त्या सामन्यातही पुजारानं अवघ्या 73 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. वॉर्विकशायरविरुद्ध पुजारानं 79 चेंडूत 107 धावांछी खेळी केली होती. त्याच सामन्यात पुजारानं एकाच षटकात 22 धावा ठोकण्याचा पराक्रम गाजवला होता. हेही वाचा - Asia Cup: सोमवारपासून मिळणार भारत-पाक सामन्याची तिकिटं, पाहा किती आहे एका तिकिटाची किंमत? काऊंटीतही पुजाराचा सुपर फॉर्म वन डे कपआधी झालेल्या काऊंटी सामन्यांमध्ये चेतेश्वर पुजारा भन्नाट फॉर्मात दिसला. पुजारानं 8 सामन्यात 109 च्या सरासरीनं तब्बल 1094 धावा केल्या. त्यात दोन द्विशतकांसह एकूण पाच शतकांचा समावेश होता. काऊंटी चॅम्पियनशीपच्या डिव्हिजन टूमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पुजारा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
First published:

Tags: Cricket news, Pujara

पुढील बातम्या