Home /News /sport /

रायुडू रॉक चाहते शॉक! अंबातीचा 2 तासांत निवृत्तीच्या निर्णयावर यू टर्न! ट्विट केलं डिलीट

रायुडू रॉक चाहते शॉक! अंबातीचा 2 तासांत निवृत्तीच्या निर्णयावर यू टर्न! ट्विट केलं डिलीट

चेन्नई सुपर किंग्जचा धडाकेबाज फलंदाज अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याने या हंगामानंतर आयपीएलमधून निवृत्ती घेण्याबाबत 2 तासांपूर्वी एक ट्विट केले होते. मात्र, नंतर ती पोस्ट डिलीट करण्यात आली. या मोसमात रायुडूचा फॉर्म फारसा चांगला राहिला नाही. त्याने 12 सामन्यात 27.10 च्या सरासरीने 271 धावा केल्या आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 14 मे : चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) धडाकेबाज फलंदाज अंबाती रायडू याच्या एका ट्विटने चाहते शॉक झाले. अंबाती रायडू (Ambati Rayudu) याने ट्विट करून या आयपीएल हंगामानंतर या स्पर्धेतून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, अवघ्या दोन तासांतच त्यांनी आपल्या विधानावर यु टर्न घेत निवृत्तीबाबत केलेले ट्विट डिलीट केले. आता रायुडूने निवृत्तीचे ट्विट का केले आणि नंतर डिलीट का केले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या ट्विटनंतर चेन्नई सुपर किंग्जमध्ये सर्व काही ठीक चालले आहे का? रायुडूने निवृत्तीबद्दल ट्विट केले होते, जे नंतर डिलीट करण्यात आले. रायडूने लिहिले, “मी आनंदाने जाहीर करतो की हा माझा शेवटचा आयपीएल हंगाम असेल. मी गेल्या 13 वर्षांत दोन महान संघांसोबत राहिलो. या अद्भुत प्रवासासाठी मी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे आभार मानू इच्छितो." 2019 मध्येही असाच यू टर्न रायुडू 2018 पासून चेन्नई सुपर किंग्जमध्ये होता. यादरम्यान, त्याने 2018 आणि 2021 मध्ये CSK सोबत जेतेपदही जिंकले. क्रिकइन्फोच्या मते, रायुडूच्या निवृत्तीच्या ट्विटनंतर चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापनाने त्याच्याशी संवाद साधला. यानंतर फलंदाजाने त्याचे ट्विट डिलीट केले. रायुडूने निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 मध्ये, विश्वचषक संघात निवड न झाल्यानंतरही त्याने सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. पण, नंतर यू-टर्न घेतला आणि देशांतर्गत आणि आयपीएल क्रिकेटमध्ये परतला. देशाची लोकसंख्या 30 हजार, पण या पठ्ठ्यांनी T20 क्रिकेटमध्ये केला वर्ल्ड रेकॉर्ड! रायुडू हा आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी खेळाडू रायुडू हा आयपीएलमधील टॉप 10 सर्वात अनुभवी क्रिकेटपटूंमध्ये मोडतो. पाच विजेतेपदांसह तो दुसरा सर्वात यशस्वी आयपीएल क्रिकेटर आहे. केवळ रोहित शर्मा (सहा) याच्याकडे त्याच्यापेक्षा जास्त आयपीएल जेतेपदे आहेत. त्याचे पाच आयपीएल जेतेपद (किरॉन पोलार्डसह) संयुक्त-दुसरे आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना, रायुडूने 2013, 2015 आणि 2017 मध्ये मुंबईसोबत आयपीएल ट्रॉफी जिंकला होता. त्यानंतर 2018 आणि 2021 मध्ये त्याचा सध्याचा संघ सुपर किंग्ससह आयपीएल ट्रॉफी जिंकली. आयसीएलशी संलग्न असल्यामुळे रायुडूला पहिली दोन वर्षे खेळता आलं नाही. रायुडूने आतापर्यंत 187 आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या 4187 धावा आणि 22 अर्धशतक आहेत. याशिवाय त्याने शतकही ठोकले आहे. रायुडू आयपीएल खेळत असला तरी. पण, देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो क्वचितच पाहायला मिळतो.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Csk

    पुढील बातम्या