तर केएस भारत आणि राहुल चहरची राखीव खेळाडू म्हणून निवड केली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील दुसरी टेस्ट भारतीय टीमनं 317 रननं दणदणीत जिंकली आहे. ऑल राऊंड कामगिरी करणारा आर. अश्विन या टेस्टचा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला आहे. पण आता तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाने नवे बदल केले आहे. अशी असेल टीम इंडिया विराट कोहली (Capt), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, शुभमन गील, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (vc), केएल राहुल, हार्दिक पांड्या,ऋषभ पंत (wk), वृद्धमान साहा (wk), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वाशिग्टन सुंदन, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमरा, सिराज पुढील समीकरण काय? सध्या दोन्ही टीमनं एक-एक टेस्ट जिंकली आहे. त्यामुळे आता अहमदाबादमध्ये होणाऱ्या शेवटच्या दोन टेस्टपैकी एका टेस्टमध्ये विजय आणि उरलेली एक टेस्ट ड्रॉ जरी झाली तरी भारताची टीम न्यूझीलंड विरुद्ध लॉर्डसमध्ये होणारी फायनल खेळू शकेल. इंग्लंडची वाट या पराभवानं आणखी खडतर झाली आहे. आता इंग्लंडला फायनल गाठण्यासाठी उरलेल्या दोन्ही टेस्ट जिंकणे आवश्यक आहे. ही मालिका जर बरोबरीत सुटली तर भारत आणि इंग्लंड या दोन्ही टीमना मागं टाकून ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीमचंही या मालिकेच्या निकालाकडं लक्ष लागलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादमध्ये सुरू होणार असून ही डे-नाईट टेस्ट असेल. तर चौथी आणि शेवटची टेस्ट अहमदाबादमध्येच 4 मार्चपासून सुरू होणार आहे.The Committee also picked five net bowlers and two players as standbys.
Net Bowlers: Ankit Rajpoot, Avesh Khan, Sandeep Warrier, Krishnappa Gowtham, Saurabh Kumar Standby players: KS Bharat, Rahul Chahar.#INDvENG — BCCI (@BCCI) February 17, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India team selection, India vs england, IPL 2021, Sports