• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: मागच्या वर्षीपर्यंत अपयशी ठरलेले मोईन-मॅक्सवेल अचानक कसे चमकले?

IPL 2021: मागच्या वर्षीपर्यंत अपयशी ठरलेले मोईन-मॅक्सवेल अचानक कसे चमकले?

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि मोईन अली (Moeen Ali) यंदाची आयपीएल (IPL 2021) गाजवत आहेत. चेन्नई सुपर किंग्ज(CSK) ला पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवून देण्यात ऑलराऊंडर असलेल्या मोईन अलीची कामगिरी महत्त्वाची ठरली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) यशासाठी मॅक्सवेलचे योगदान मोलाचे ठरले आहे.

 • Share this:
  मुंबई, 3 मे :  ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि मोईन अली (Moeen Ali) यंदाची आयपीएल (IPL 2021) गाजवत आहेत. चेन्नई सुपर किंग्ज(CSK) ला पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवून देण्यात ऑलराऊंडर असलेल्या मोईन अलीची कामगिरी महत्त्वाची ठरली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) यशासाठी मॅक्सवेलचे योगदान मोलाचे ठरले आहे. पंजाब किंग्ज विरुद्ध शुक्रवारी झालेल्या सामन्यात मॅक्सवेल शून्य रनवर आऊट झाला असला तरीही त्याच्या कामगिरीचे मोल कमी होत नाही. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि प्रशिक्षकांनीही त्याचं  कौतुक केलं आहे. गेल्या लिलावात मोईन आणि मॅक्सवेल या दोघांनाही त्यांच्या अनुक्रमे आरसीबी आणि पंजाब किंग्ज या टीमनी रिलीज केलं होतं. ‘महागड्या चुका’ म्हणून संबोधण्यात आलेल्या या दोघांना यंदा त्यांच्या आधीच्या फ्रँचायझीनी आपल्या टीममध्ये स्थान दिलं नाही. शेवटच्या लिलावात मॅक्सवेलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं तर मोईनअलीला चेन्नई सुपर किंग्जनं चांगली भरभक्कम किंमत देऊन घेतलं, तेव्हाही शंका व्यक्त करण्यात आली होती; पण हे दोघेही आपल्या टीमच्या अपेक्षांवर खरे उतरत आहेत. एखाद्या टीममध्ये असताना चांगल्या कामगिरीसाठी झगडत असलेले खेळाडू दुसरीकडं जातात तेव्हा त्यांच्या कामगिरीत अमुलाग्र सुधारणा होते हे बघणं अत्यंत मनोरंजक आहे. आर्थिक संदर्भात ज्याला नॉन-परफॉर्मिंग अॅसेट म्हटलं जातं, तसे हे अयशस्वी ठरलेले खेळाडू एका टीममधून दुसरीकडे जातात तेव्हा त्यांच्या कामगिरीत लक्षवेधक बदल होतो, असे नेमके यात काय घडतं यावर संशोधन झालेलं नसलं, तरी काही ट्रिगर पॉईंट्सकडे भारताचे माजी खेळाडू यजुवेंद्र सिंह यांनी लक्ष वेधलं आहे. ‘लवकरात लवकर सूर गवसणे हे खूप महत्त्वाचे आहे, असं ते म्हणतात. फॉर्म आणि सूर सापडत नसल्यानं संघर्ष करणार्‍यांसाठी बॉलर्स किंवा बॅटसमनसाठी असा बदल खूप वाईट असू शकतो,असंही त्यांनी म्हटलं आहे. कोणताही खेळाडू बॉलिंग किंवा बॅटिंगसाठी आपला सूर शोधण्यासाठी फार वेळ देऊ शकत नाही, असे यजुवेंद्र सिंह म्हणतात. तुम्ही खूप जास्त बॉलिंग केली पण विकेट नाही घेतली तर तुम्ही संकटात सापडू शकता. एका बॉलरला एका डावात फक्त चार ओव्हर्स असतात, त्यात तो एक किंवा दोन ओव्हर्स योग्य लाईन आणि लेन्थ शोधण्यासाठी घालवू शकत नाही,असंही त्यांनी नमूद केलं. आयपीएलमधील प्रत्येक सामन्याचा वेग वेगळा असतो. एक आड एक दिवस मॅचेस असतात. अशा वेळी नेट प्रॅक्टिससाठी जास्त संधी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे खेळाडूंना जशी संधी मिळेल तसतशी सुधारणा करणं, शिकणं आवश्यक आहे. याकरता स्पर्धेच्या प्रारंभापासूनच खेळाडूंची मानसिकता सकारात्मक असणं आणि त्यांचा सूर गवसलेला असणं आवश्यक आहे.तसं नसेल तर तुम्ही तुमची जागा गमवाल,जी परत मिळवणे अवघड आहे त्यामुळे हंगामात तुम्ही अपयशी ठरू शकता, असंही यजुवेंद्रसिंह यांनी म्हटलं आहे. मॅक्सवेल आणि मोईनची गेल्या हंगामातील कामगिरी पाहिली तर यजुवेंद्र यांचे म्हणणे योग्य ठरते. दोघेही चांगली सुरुवात करू शकले नाहीत आणि पूर्ण स्पर्धेतही ते चाचपडत राहीले. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. परंतु लवकरात लवकर सूर सापडणे महत्त्वाचे असले तरी नवीन खेळाडू टीममध्ये कसा सेटल होतो हेही महत्त्वाचे आहे. चुकीला अत्यंत कमी जागा असणाऱ्या टी-20 सारख्या स्पर्धेत योग्य भूमिकेसाठी योग्य खेळाडूची निवड करणे सर्वात महत्त्वाचे ठरते. उदाहरणार्थ,आरसीबीनं या हंगामात मॅक्सवेलला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर स्थान दिलं. गेल्या हंगामात पंजाबकडे तो 5व्या किंवा 6व्या क्रमांकावर फिनिशर म्हणून वापरला गेला होता. टीमचा संघर्ष सुरू झाली की त्याला वर किंवा खाली स्थान देण्यात येत होतं. बॅटिंगसाठी एक निश्चित स्थान असणं याची एक स्वतंत्र जबाबदारी असते. मॅक्सवेल त्याच्या बॅटिंगच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळं एक-दोन विकेट लवकर गेल्या तर त्याच्या सामर्थ्याबाबत कोणतीही तडजोड न करता आरसीबीचा डाव सावरण्याची जबाबदारी त्याच्यावर येते. त्यानं किती चांगलं काम केलं, हे त्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यानं मधल्या ओव्हर्समध्ये सर्वाधिक रन घेतल्या आहेत, तसेच सर्वात जास्त फोर देखील याच ओव्हर्समध्ये मारले आहेत. मोईन अलीला सीएसकेनं तिसरं स्थान दिलं आहे. त्यानं फार मोठी खेळी केलेली नाही,परंतु त्याची कामगिरी सातत्यपूर्ण आहे. तो वेगवान रन घेतो त्यामुळं फिल्डिंगवर दबाव वाढतो. त्यानं ऑफ स्पिनवरही उत्तम नियंत्रण मिळवलं असून, जडेजाच्या बरोबरीनं चांगली जोडी जमवली आहे. या खेळाडूंनी त्यांच्या पूर्वीच्या फ्रँचायझीसाठीसुद्धा अशीच कामगिरी करण्याची अपेक्षा केली होती. केआरए बदलले असले तरी या खेळाडूंची योग्यठिकाणी स्थान मिळाल्यास यशाची शक्यता वाढते. नवीन बॅटिंग पोझिशन दिल्यानं आणि टॉप-डाऊन कम्युनिकेशन झाल्यानं खेळाडूच्या कामगिरीवर नक्कीच चांगला परिणाम होतो, हे यातून स्पष्ट होतं. खेळाडूला त्याच्या कौशल्याबद्दल चांगले वाटणे, त्याला महत्त्वाचे स्थान असणे आवश्यक आहे. त्यामुळे टीमची संस्कृती आणि उद्दिष्ट यांच्याशी त्याची लवकरात लवकर नाळ जुळते, असं मत टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मांडलं. प्रस्थापित खेळाडूंपेक्षा युवा खेळाडूंना टीममध्ये  स्थान मिळवणे सोपे आहे. आरसीबीसाठी पडिकक्कल,सीएसकेसाठी गायकवाड, केकेआरसाठी गिल आणि पूर्वी रैना आणि जडेजा सीएसकेसाठी, आरसीबीसाठी कोहली आणि मुंबईसाठी रोहित. उदाहरणार्थ, दोन उत्कृष्ट फलंदाज युवराज सिंग आणि केव्हिन पीटरसन हे वेगवेगळ्या टीममध्ये टिकू शकले नाहीत. राजस्थान रॉयल्समध्ये खेळलेल्या अजिंक्य रहाणेला दिल्लीकॅपिटल्समध्ये अडचण आहे.ख्रिस गेल हा एकमेव खेळाडू आहे, जो या नियमाला अपवाद ठरलाआहे. विरोधाभास स्पष्ट करण्यासाठी मॅक्सवेल आणि मोईन यांच्यासारखे बरेच खेळाडू आहेत. उदाहरणार्थ, मुंबई इंडियन्समध्ये दाखल होताच प्रभाव दाखविणारा बुमराहचा जोडीदार बनलेला ट्रेंट बोल्ट आणि सीएसकेसाठी कामगिरी करणारे ड्वेन ब्राव्हो. हे फक्त परदेशी खेळाडूंसाठी लागू नाही, तर गौतम गंभीरदेखील केकेआरला गेल्यानंतर चमकला होता. आयपीएलमधील राष्ट्रीय, सांस्कृतिक, धार्मिक वैविध्यपूर्णतेमुळे खेळाडूंनी वेगानं टीममध्ये रुजावं आणि अपेक्षित निकाल द्यावेत यासाठी आपलं व्यवस्थापन कौशल्य दाखवण्याचं आव्हान कर्णधार आणि इतरांसमोर असतं. सांघिक खेळांमध्ये केवळ कौशल्यच महत्त्वाचे नसते, तर खेळाडू आणि एक टीम यांच्यातील केमिस्ट्रीदेखील उत्कृष्ट कामगिरीसाठी महत्त्वाची ठरते. यासाठी कोणतही फॉर्म्युला नाही. उत्कृष्ट नेतृत्वात सर्वांमधील उत्कृष्टता बाहेर आणण्याचे कसब असते, ज्यामुळे एकत्रितपणे चांगली कामगिरी शक्य होते. बहुतेक वेळा जेतेपद जिंकलेल्या टीममध्ये कमीतकमी उलथापालथआणि बदल झाले आहेत, हे आश्चर्यकारक नाही.
  First published: