जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Yuzvendra Chahal divorce: खरंच चहल-धनश्रीचा घटस्फोट झालाय का? ANI चा स्क्रीनशॉट Viral

Yuzvendra Chahal divorce: खरंच चहल-धनश्रीचा घटस्फोट झालाय का? ANI चा स्क्रीनशॉट Viral

युजवेंद्र चहल-धनश्री वर्मा

युजवेंद्र चहल-धनश्री वर्मा

Yuzvendra Chahal: चहल आणि धनश्रीमध्ये काहीतरी बिनसलंय अशा बातम्या सध्या सोशल मीडियात फिरत आहेत. दरम्यान एएनआयच्या ट्विटरवरुन त्या दोघांच्या घटस्फोटाच्या बातमीचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. पण त्याबाबत आता एएनआयनं स्पष्टीकरण दिलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑगस्ट**:** टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा ही जोडी गेल्या वर्षभरापासून नेहमी चर्चेचा विषय ठरतेय. याचं कारण सोशल मीडियातला त्यांचा वावर. चहल टीम इंडियाचा सध्याचा हुकमी एक्का आहे. तर धनश्री ही एक यूट्यूबर आहे. तसच सोशल मीडियात तिचे व्हिडीओज ट्विटर आणि इन्स्टा पोस्ट यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. पण हीच जोडी एका वेगळ्याच कारणामुळे सध्या चर्चेत आली ती म्हणजे त्या दोघांच्या घटस्फोटाची बातमी. चहल आणि धनश्रीमध्ये काहीतरी बिनसलंय अशा बातम्या सध्या सोशल मीडियात फिरत आहेत. आणि त्यामागचं कारण आहे धनश्री वर्मानं इन्स्टाग्रामवरुन हटवलेलं चहल हे आडनाव. धनश्रीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आधी धनश्री वर्मा-चहल असं लिहिलेलं होतं. पण आता तिनं चहल हे नाव हटवलं आणि चर्चा सुरु झाली ती त्यांच्या नात्यातल्या दुराव्याची. एएनआयच्या अकाऊंटवरुन ट्विट दरम्यान चहल आणि धनश्री वर्मानं पंजाब कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केलाय असं ट्विट एएनआयच्या अकाऊंटवरुन पडलं. त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. पण एनएनआयनं आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन ट्विट करत फेक अकाऊंटवरुन कुणीतरी ते ट्विट केलं असल्याची माहिती दिली. आणि दोघांच्या घटस्फोटाविषयी अशी कोणतीही बातमी नसल्याचं स्पष्ट केलं.

जाहिरात

चहलची संभ्रमात टाकणारी स्टोरी धनश्री वर्मानं इन्स्टावरुन आडनाव हटवलं आणि त्यानंतरच्या सगळ्या चर्चांना हवा दिली ती युजवेंद्र चहलच्या एका इन्स्टा स्टोरीनं. या स्टोरीमध्ये चहलनं एक फोटो शेअर केला. त्यात लिहिलं होतं ‘New life loading…’ याच पोस्टमुळे दोघांच्या नातेसंबंधात काहीतरी बिनसलंय हे समोर आलं. धनश्रीची नवी इन्स्टाग्राम पोस्ट त्यात भर टाकली ती धनश्रीच्या नव्या पोस्टनं. तिनं स्वत:चाच एक फोटो पोस्ट करत ‘एक राजकुमारी तिचं दु:ख हेच तिची ताकद बनवेल’ असं म्हटलंय. एकूणच सोशल मीडियातल्या दोघांच्या परस्पर विरोधी पोस्टमुळे धनश्री आणि चहलमध्ये सगळं आलबेल नसल्याचं समोर आलं. एकूणच दोघांमधल्या या सगळ्या गोष्टी सध्या तरी सोशल मीडियापुरत्या मर्यादित आहेत. कारण अजून तरी कुणीही कॅमेऱ्यासमोर येऊन बोललेलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात