मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मालिकेतील पराभव जिव्हारी लागला? विराट कोहलीचं धक्कादायक विधान

मालिकेतील पराभव जिव्हारी लागला? विराट कोहलीचं धक्कादायक विधान

या सगळ्याला कंटाळून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं काही दिवसांपूर्वी 2021 टी -20 वर्ल्ड कपनंतर कोणता तरी एक फॉर्मेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच पहिल्यांदा कोहलीनं निवृत्तीचे संकेत दिले.

या सगळ्याला कंटाळून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं काही दिवसांपूर्वी 2021 टी -20 वर्ल्ड कपनंतर कोणता तरी एक फॉर्मेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच पहिल्यांदा कोहलीनं निवृत्तीचे संकेत दिले.

वनडे मालिकेत पराभव झाल्यानंतर विराट कोहलीचा अंदाज हा काहीसा हैराण करणारा होता. विराटनं धक्कादायक विधान केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

  • Published by:  Manoj Khandekar
ऑकलँड, 08 फेब्रुवारी: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं. हॅमिल्टननंतर ऑकलँडमधल्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवत वनडे मालिका 2-0ने जिंकली. या पराभवानंतर मात्र, टीम इंडियाचा कर्णधार आणि रनमशिन विराट कोहलीने धक्कादायक विधान केल आहे. त्याच्या या विधानानंतर मालिकेमधला पराभव विराटच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. दरम्यान, यावेळी विराटनं टी20मधील टीम इंडियाच्या खेळावर लक्ष वेधलं. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने 5-0ने विजय मिळवल्यानंतर, वनडे मालिकेवरही भारत सहज विजय मिळवेल, असा विश्वास क्रिकेटप्रेमींना होता. वनडे मालिकेतही विराटसेना आपली दमदार कामगिरीचं प्रदर्शन करणार, असंही सांगितलं जातं होतं. परंतु, वनडे मालिकेत पराभव झाल्यानंतर विराट कोहलीचा अंदाज हा काहीसा हैराण करणारा होता. विराटनं धक्कादायक विधान केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ‘यावर्षी कसोटी आणि टी20 मालिका महत्त्वपूर्ण आहे, म्हणून वनडे मालिकेत पराभव झाला तरी मला फरक नाही पडतं’, असं विधान विराटनं केले आहे. (हेही वाचा : चहलचं वनडेमध्ये 177 दिवसानंतर कमबॅक, 10 ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी!) विराट म्हणाला... विराट कोहली म्हणाला, ‘दोन सामने खूप चांगले झाले. चाहत्यांनीही आनंद लुटला असेल. ज्याप्रकारे या सामन्यांत विजय आम्हाला मिळाला, यामुळे मी खूप प्रभावित झालो आहे. यावेळी जडेजा आणि सैनी खूप चांगली फलंदाजी केली. श्रेयस अय्यरनेही उत्कृष्ट फलंदाजी केली. जर आपण टी20 आणि कसोटीची तुलना केली तर, यावर्षी आमच्यासाठी वनडे सामने अधिक महत्त्वपूर्ण नाहीत. आम्ही चांगली कामगिरी करू, आम्हाला निकालाची चिंता करणार नाही.’ अखेरच्या वनडेमध्ये होणार बदल आता अखेरच्या वनडे सामन्यामध्ये टीम इंडियाच्या संघात आम्ही बदल करण्याच्या विचारात आहोत, अशी माहिती विराटने दिली. आता आमच्याकडे गमवण्यासारखं काहीही नाही, असंही विराटनं यावेळी सांगितलं. 11 फेब्रुवारी रोजी अखेरचा वनडे सामना खेळला जाणार आहे. (हेही वाचा : India vs New Zealand 2nd ODI: टीम इंडियाचा पराभव, 22 धावांनी न्यूझीलंडचा विजय) दुसऱ्या वनडेमध्ये भारताची कामगिरी दुसऱ्या वनडे सामन्यात फलंदाजीमध्ये विराटची कामगिरी फ्लॉप ठरली. मात्र, नवदीप सैनीने (45) जडेजाच्या साथीनं चमकदार कामगिरी करत भारताला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी श्रेयस अय्यर (52) आणि रवींद्र जडेजाने (55) धावांची अर्धशतकी खेळी केली तर, जवळपास 6 महिन्यांनी वनडे संघात पुनरागमन केलेल्या युजवेंद्र चहलनेही गोलंदाजीत ठसा उमटवत 10 ओव्हरमध्ये 58 धावा देत 3 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडने दिलेलं 274 धावांचं लक्ष्य गाठताना टीम इंडियाला 251 धावांपर्यंतच मजल मारता आली. या पराभवानंतर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताचा पराभव झाला.
First published:

Tags: Cricket

पुढील बातम्या