मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

चहलचं वनडेमध्ये 177 दिवसानंतर कमबॅक, 10 ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी!

चहलचं वनडेमध्ये 177 दिवसानंतर कमबॅक, 10 ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी!

जवळपास 6 महिन्याने टीम इंडियाच्या वनडे संघात पुनरागमन केलेल्या फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) 3 महत्त्वपूर्ण विकेट्स घेत आपला ठसा उमटवला.

जवळपास 6 महिन्याने टीम इंडियाच्या वनडे संघात पुनरागमन केलेल्या फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) 3 महत्त्वपूर्ण विकेट्स घेत आपला ठसा उमटवला.

जवळपास 6 महिन्याने टीम इंडियाच्या वनडे संघात पुनरागमन केलेल्या फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) 3 महत्त्वपूर्ण विकेट्स घेत आपला ठसा उमटवला.

  • Published by:  Manoj Khandekar
ऑकलँड, 08 फेब्रुवारी: न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zeland) दुसऱ्या वनडे (one day) सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. भारताच्या पराभवामुळे न्यूझीलंडने ही मालिका (one day series) 2-0ने खिशात घातली आहे. भारतापुढे न्यूझीलंडने 274 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला केवळ 251 धावाच करता आल्या. या वनडे सामन्यात टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर (52) आणि रवींद्र जडेजाने (55) धावांची अर्धशतकी खेळी केली तर, नवदीप सैनी 45 धावांची खेळी करत टीम इंडियावा विजयाजवळ नेण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, जवळपास 6 महिन्याने टीम इंडियाच्या वनडे संघात पुनरागमन केलेल्या फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) 3 महत्त्वपूर्ण विकेट्स घेत आपला ठसा उमटवला. चहलने तब्बल 177 दिवसानंतर संघात पुनरागमन केलं आहे. मोठ्या काळानंतर चहल टीम इंडियाच्या वनडे संघात खेळणार असल्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. यावेळी चहलनेही जबदरस्त कामगिरीचं प्रदर्शन केलं. पहिल्या वनडे सामन्यात कुलदीप यादवला संघात स्थान देण्यात आलं होतं. यावेळी कुलदीप मात्र, फ्लॉप ठरल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर विराट कोहलीने चहलवर विश्वास ठेवत दुसऱ्या वनडे सामन्यात मैदानात उतरवले. चहलनेही आपल्या चमकदार कामगिरीने टीम इंडियाची गोलंदाजीची बाजू भक्कम ठेवली. जवळपास 6 महिन्यांनी वनडे संघात पुनरागमन केलेल्या चहलने स्वत:ला सिद्ध केलं. टीम इंडियाचा दुसऱ्या वनडेमध्ये चहला हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. चहलने 10 ओव्हरमध्ये 58 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. चहलने भारतासाठी 3 महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवत न्यूझीलंडच्या फलंदाजांवर लगाम लावला. त्यामुळे न्यूझीलंड 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्सच्या मोबदल्यात 273 धावा केल्या.  चहलने 14 ऑगस्ट, 2019 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचा वनडे सामना खेळला होता. पॉर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात चहलने 7 ओव्हरमध्ये 32 धावा देत एक विकेट घेतली होती. टीम इंडियाला मिळवून दिल्या 3 महत्त्वपूर्ण विकेट्स दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडची सुरूवात शानदार राहिली. सलामीला आलेल्या फलंदाजांनी चांगली भागीदारी रचली. Henry Nicholls (41) आणि Martin Guptill (79) यांच्या जबरदस्त खेळीमुळे न्यूझीलंड मोठी धावसंख्या उभी करणार, असा अंदाज होता. परंतु, युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) ने Nicholls ला 41 धावांवर माघारी धाडत पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर सातत्याने पडलेल्या विकेट्समुळे न्यूझीलंडचा संघ गडगडला. यामुळे मोठा धावसंख्या उभारण्यात न्यूझीलंड अपयशी ठरला. चहलने Mark Chapaman आणि Tim Southee ला तंबूत पाठवलं. दरम्यान, चहलने पुन्हा एकदा संघात दमदार पुनरागमन केलं असलं तरीही न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताला पराभवाला सामोरे जावं लागलं आहे.
First published:

पुढील बातम्या