दिल्ली, 26 मे : महिला कुस्तीपट्टूंनी लैंगिक छळाचे आरोप केल्यानंतर आता भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी पॉक्सो एक्टबद्दल मोठं विधान केलं आहे. बृजभूषण यांनी म्हटलं की, पॉक्सो कायद्याचा गैरवापर होत आहे. या कायद्याला बदलण्यासाठी सरकारला भाग पाडू.
बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या कुस्तीपट्टूंनी अपील केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल केली होती. बृजभूषण सिंह यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला होता.
गुजरात की मुंबई, कोण गाठणार फायनल? पाहा IPLची आकडेवारी काय सांगते
बृजभूषण शरण सिंह यांनी येत्या पाच जूनला अयोध्येत संतांच्या रॅलीचे आवाहन केले आहे. यात 11 लाख संत पोहोचतील असा दावाही त्यांनी केलाय. या रॅलीच्या तयारीबाबत एक सभाही बृजभूषण सिंह यांनी घेतली. याआधी त्यांनी महिला कुस्तीपटू विनेश फोगाटची तुलना मंथराशी केली होती. त्रेतायुगाचा उल्लेख करताना ते म्हणाले होते की, प्रभू रामचंद्रांच्या वनवासावेळी मंथरा आणि कैकेयीची भूमिका होती. विनेश फोगाट यावेळी मंथरा बनून आलीय.
सभेत बोलताना भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी पॉक्सो कायदा आणि त्याच्या तरतुदींचा विरोध करताना म्हटलं की याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे. या कायद्याचा मुलं, वृद्ध आणि संतांविरोधात गैरवापर होत आहे. अधिकारीही याच्या गैरवापरातून सुटले नाहीत. संतांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकारला कायदा बदलण्यासाठी भाग पाडू. माझ्याविरोधातील आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांच्याकडे माझ्याविरुद्ध काहीच पुरावे नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Wrestler