आकाश मधवालच्या गोलंदाजीच्या जोरावर एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला पराभूत करून मुंबईने आयपीएल फायनलच्या दिशेने एक पाऊल टाकलं. आता फायनलमध्ये धडक मारण्यासाठी मुंबईला गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे. मधवालने 5 धावात 5 विकेट घेतल्या, त्या जोरावर मुंबई इंडियन्सने गुजरातवर 81 धावांनी विजय मिळवला.
कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड यांनी आतापर्यंत आव्हानाचा सामना चांगल्या पद्धतीने केला आहे. त्यांच्याशिवाय युवा फलंदाज नेहल वढेरानेसुद्धा चमक दाखवली आहे. तर रोहित शर्मा आणि इशान किशन यांची सलामीची जोडीही त्यांची भूमिका पार पाडत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या दिशेने पावले टाकत आहे.