मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

BREAKING : शिखर धवन, गायकवाडसह 8 जणांना कोरोनाची लागण, विंडीज सीरिज धोक्यात!

BREAKING : शिखर धवन, गायकवाडसह 8 जणांना कोरोनाची लागण, विंडीज सीरिज धोक्यात!

चार दिवसांनी वनडे सीरिज सुरू होणार आहे. त्याआधीच कोरोनाने एंट्री केली आहे.

चार दिवसांनी वनडे सीरिज सुरू होणार आहे. त्याआधीच कोरोनाने एंट्री केली आहे.

चार दिवसांनी वनडे सीरिज सुरू होणार आहे. त्याआधीच कोरोनाने एंट्री केली आहे.

  • Published by:  sachin Salve

अहमदाबाद, 02 फेब्रुवारी : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) सीरिज लवकरच सुरू होणार आहे. पण त्याआधीच कोरोनाचे संकट आले आहे. टीम इंडियाचे 8 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan ), ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर सह 8 जण पॉझिटिव्ह आढळले आहे. चार दिवसांनी वनडे सीरिज सुरू होणार आहे. त्याआधीच कोरोनाने एंट्री केली आहे.

8 भारतीय खेळाडू पॉझिटिव्ह आले आहे.  दोन्ही टीम एकाच हॉटेलमध्ये थांबल्या आहेत. पण, हॉटेलमध्ये आरटीपीसीआर चाचणी केली होती. तेव्हा  टेस्ट निगेटिव्ह आले होते. पण आज  शिखर धवनसह आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यानं खबरदारीचा उपाय सर्व खेळाडूंची काळजी घेण्यात आली होती. पण अचानक एकाच वेळी ८ खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे.  6 फेब्रुवारीपासून वनडे सीरिज सुरू होणार आहे.

दरम्यान, भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील मालिकेसाठी टीम इंडियाच्या 18 खेळाडूंची घोषणा टीम इंडियाने यापूर्वीच केली आहे. त्यानंतर दोन तरूण खेळाडूंचा स्टँडबाय म्हणून टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. देशातील कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून या खेळाडूंचा निवड समितीनं समावेश केला आहे.

'टाईम्स ऑफ इंडिया' च्या वृत्तानुसार तामिळनाडूचा आक्रमक बॅटर शाहरूख खान (Shahrukh Khan) आणि स्पिनर रविकृष्णन साई किशोर (Ravisrinivasan Sai Kishore) यांचा स्टँड बाय खेळाडू म्हणून टीममध्ये समावेश केला आहे. शाहरूख खाननं गेल्या काही महिन्यात आक्रमक बॅटींगनं भारतीय क्रिकेट गाजवलं आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत त्याने तामिळनाडूला विजेतेपद मिळवून दिले होते. वेस्ट इंडिज विरूद्धच्या मुख्य टीममध्ये दीपक हुडाला (Deepak Hooda) शाहरूखच्या ऐवजी प्राधान्य देण्यात आले आहे.

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज T20 मालिकेचे वेळापत्रक

16 फेब्रुवारी - पहिली T20, कोलकाता

18  फेब्रुवारी - दुसरी T20, कोलकाता

20 फेब्रुवारी - तिसरी T20, कोलकाता

T20 मालिकेसाठी वेस्ट इंडिजची टीम :  कायरन पोलार्ड (कॅप्टन), निकोलस पूरन, फॅबियन एलन, डॅरेन ब्रावो, रोस्टन चेज, शेल्डन कॉट्रेल, डोमिनिक ड्रेक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील हुसेन, ब्रेडन किंग, रोवमॅन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, काइल मायर्स, ओडियन स्मिथ आणि हेडन वॉल्श ज्युनिअर.

वेस्ट इंडिजची वन-डे टीम :  कायरन पोलार्ड (कर्णधार), केमार रोच, एनक्रुमाह बोनर, ब्रँडन किंग, फॅबियन एलेन, डॅरेन ब्राव्हो, शामराह ब्रुक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील हुसेन, अलझारी जोसेफ, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ आणि  हेडन वॉल्श ज्युनिअर

भारताची वन-डे टीम : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान

भारताची टी20 टीम : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिष्णोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल

First published:

Tags: Ahmedabad