जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / क्रिकेट विश्वाला अजून एक धक्का; 'या' स्टार खेळाडूच्या गाडीला भीषण अपघात; कँटरनं दिली धडक

क्रिकेट विश्वाला अजून एक धक्का; 'या' स्टार खेळाडूच्या गाडीला भीषण अपघात; कँटरनं दिली धडक

'या' स्टार खेळाडूच्या गाडीला भीषण अपघात

'या' स्टार खेळाडूच्या गाडीला भीषण अपघात

Pravin Kumar Accident: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. मुलासोबत जात असताना या क्रिकेटपटूच्या गाडीला कँटरने धडक दिल्याची घटना घडली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 05 जुलै: गेल्या वर्षी क्रिकेटपटू ऋषभ पंतचा भयंकर अपघात घडल्याची बातमी समोर आली होती. त्यातून आता तो बरा होत असतानाच क्रिकेट चाहत्यांसाठी अजून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. मुलासोबत जात असताना या क्रिकेटपटूच्या गाडीला कँटरने धडक दिल्याची घटना घडली आहे. माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार यांच्या कारला मंगळवारी रात्री उशिरा आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ भरधाव वेगानं येणाऱ्या कॅंटरने धडक दिली. यात क्रिकेटपटू प्रवीणकुमार थोडक्यात बचावले आहेत. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी कॅंटर चालकाला अटक केली आहे. या अपघाताच्या वेळी त्यांचा मुलगाही त्यांच्यासोबत होता अशी माहिती मिळाली आहे. Ajit Agarkar : ‘अजित’ना सुगीचे दिवस, आगरकरला टीम इंडियात सगळ्यात मोठी जबाबदारी बागपत रोडवरील मुलतान नगर येथील रहिवासी प्रवीण कुमार मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या डिफेंडर वाहनाने पांडव नगर इथून येत होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही होता. ते आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ पोहोचताच समोरून भरधाव वेगात आलेल्या कॅंटरने त्यांच्या कारला धडक दिली. घ अपघात इतका भयंकर होता की यामध्ये वाहनाचं नुकसान झालं आहे, तर प्रवीण कुमार आणि त्यांचा मुलगा थोडक्यात बचावले आहेत. अपघातानंतर तिथे लोकांचा जमाव जमला, त्यांनी कॅंटर चालकाला जागीच पकडलं. माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. World Cup : 58 दिवसांची मेहनत आणि डोळ्यासमोर आशिया कप, के एल राहुलच्या ‘त्या’ पोस्टनं चर्चा एसपी सिटी पीयूष कुमार यांनी सांगितलं की, कॅंटर चालकाला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात पाठवण्यात आलं आहे. तसंच अपघातात प्रवीण कुमार आणि त्यांचा मुलगा सुरक्षित आहेत अशीही माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात