गांगुलीनं आवळल्या पाकच्या मुसक्या, एकाही खेळाडूला आशिया इलेव्हन संघात देणार नाही जागा

गांगुलीनं आवळल्या पाकच्या मुसक्या, एकाही खेळाडूला आशिया इलेव्हन संघात देणार नाही जागा

बांगलादेशमध्ये होणाऱ्या आशिया इलेव्हनमध्ये एकही पाक खेळाडू खेळणार नाही.

  • Share this:

मुंबई, 26 डिसेंबर : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर एक-एक मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. असाच एक मोठा निर्णय गांगुलीनं आज घेतला. बांगलादेश क्रिकेट बोर्ड (Bangladesh Cricket Board) आशिया इलेव्हन (Asia XI) आणि वर्ल्ड इलेव्हन (World XI) यांच्यात मार्चमध्ये दोन टी-20 सामन्यांचे आयोजन केले आहे. मात्र बीसीसीआयनं या स्पर्धेत एकाही पाकिस्तानी खेळाडूला खेळण्याची संमती दिली नाही आहे.

आशिया इलेव्हन स्पर्धेत भारत, बांगलादेश आणि अफगाणिस्तान अशा तीन देशांचे खेळाडू खेळणार आहेत. बांगलादेशचे संस्थापक ‘बोंगोबोंधु’ शेख मुजीबुर रहमान (Sheikh Mujibur Rahman) यांची जन्मशताब्दीनिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आयसीसीने या खेळांना अधिकृत दर्जा दिल्याचे म्हटले जात आहे. बीसीसीआय (BCCI) अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर यापैकी एका सामन्याचे आयोजन करेल. या स्पर्धेत क्रिकेट विश्वातील विविध खेळाडूं सहभाग घेणार असल्याचे समजले जात आहे.

वाचा-कॅप्टन कोहलीची शानदार कामगिरी! दशकातल्या टॉप-5 खेळाडूंमध्ये मिळवले स्थान

मात्र या स्पर्धेत भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट संबंध थांबवण्यात आल्यामुळं एकही पाक खेळाडू सामिल होणार नाही आहे. दोन्ही देशांतील क्रिकेट टीममध्ये द्विपक्षीयक्रिकेट मालिका खेळली जात नाही. यासंबधी आयएएनएसशी बोलताना बीसीसीआयचे सहसचिव जयेश जॉर्ज यांनी, भारत आणि पाकिस्तानचे दोन्ही खेळाडू आशिया इलेव्हनमध्ये एकत्र खेळतील अशी परिस्थिती उद्भवणार नाही कारण कोणताही पाकिस्तानी खेळाडू आमंत्रित नसतील, असे सांगितले.

वाचा-VIDEO : 130 किमी वेगानं आला चेंडू, फलंदाज जमिनीवर आणि स्टम्प हवेत!

दरम्यान, बांग्लादेशमध्ये आयोजित या स्पर्धेसाठी गांगुली मोठ्या नावांना खेळू देईल की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे कारण या दरम्यान टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. आशिया इलेव्हन विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन 18 ते 22 मार्च दरम्यान खेळली जाणार आहे.

वाचा-विराट आणि शास्त्रींमुळे संपणार होते मुंबईकर खेळाडूचे करिअर, धक्कादायक खुलासा

गांगुली करणार 5 खेळाडूंनी निवड

बीसीबीआयने धोनी, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार आणि रोहित शर्मा यांना पाठवावे अशी इच्छा व्यक्त केली होती.  पण, अखेरचा निर्णय गांगुलीच घेतील आणि यापैकी कोणते खेळाडू आशिया इलेव्हनचा भाग बनेल हे लवकरच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2019 03:22 PM IST

ताज्या बातम्या