मुंबई, 27 मार्च : आजकाल जगभरातील बहुतांश सेलेब्रिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. अनेक सेलेब्रिटी आपल्या खासगी जीवनातील घटना, अनुभव आणि घडामोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसाठी शेअर करत असतात. सेलेब्रिटींचा अशा पोस्टला नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. काही वेळा हे सेलेब्रिटी विविध कारणांमुळे ट्रोल देखील होतात. सध्या असाच एक सेलेब्रिटी सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. या चर्चेमागे रिलेशनशीप हे कारण आहे. प्रसिद्ध बॉक्सर चॅम्पियन डेव्हिड हाये दोन गर्लफ्रेंडसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे. डेव्हिड त्याच्या दोन्ही गर्लफ्रेंडसोबत सुट्टयांचा आनंद घेत असतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या रिलेशनशिपची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. प्रसिद्ध प्रोफेशनल बॉक्सर डेव्हिड हाये सध्या दोन गर्लफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. डेव्हिड हा ब्रिटनमधील अत्यंत लोकप्रिय बॉक्सर असून तो कोस्टा रिका येथे सुट्ट्यांचा आनंद घेत होता. दरम्यान डेव्हिडचा सियान ओसबोर्न आणि उना हॅलीसोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे. Virat Kohli New Tattoo : विराट कोहलीचा नवीन टॅटू पाहिला का? नक्की काय आहे त्यात खास 42 वर्षांचा माजी जगज्जेता डेव्हिड 2020 पासून सियानसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र आता तो 41 वर्षांची गायिका हॅलीसोबतदेखील रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. डेव्हिड हाये याने कोस्टा रिकातील एका सुंदर समुद्र किनाऱ्यावर गर्लफ्रेंड सियानचा वाढदिवस साजरा केला होता. या वेळी त्यांचे मित्रमैत्रिणी उपस्थित होते. सियान डेव्हिड पेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. डेव्हिडने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिलं की, “जोडीदाराचा 31 वा वाढदिवस अत्यंत सुंदर क्षण आहे”. ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी डेव्हिड, सियान आणि हॅली मोरोक्कोला गेले होते. या तिघांनी आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. यावरून लोकांनी त्यांना अनेकविध प्रश्न विचारले. त्यामुळे डेव्हिडने नुकताच सियानचा वाढदिवस साजरा केला तेव्हा त्याठिकाणी हॅली उपस्थित नव्हती. पण हे तिघेही बहुतेक प्रसंगी एकत्र दिसत असतात.
डेव्हिड हे नातं कधीच उघडपणे स्वीकारत नाही, असं म्हटलं जातं. पण तो आणि सियान, हॅली एका डेटिंग अॅपवर भेटले होते. यानंतर त्याने या मुलीला रिलेशनशिपमध्ये समाविष्ट करुन घेतलं. याबाबत त्याला प्रश्न विचारण्यात आला असता त्याने सांगितले की, “मला माझे वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक करायचे नाही”. पण सध्या डेव्हिडची सियान आणि हॅलीसोबतची दुहेरी रिलेशनशिप सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरली आहे.