मुंबई, 27 मार्च : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात असून तो आता आयपीएलमध्ये देखील त्याच्या फलंदाजीचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झालेला आहे. आयपीएलच्या 16 व्या सीजनसाठी विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच नवीन हेअरस्टाईल केल्याचे समोर आले होते. आता यासोबतच विराटने त्याच्या शरीरावर नवा टॅटू देखील काढल्याचे पाहायला मिळत आहे. विराट कोहली हा टॅटू प्रेमी आहे. विराट कोहलीच्या शरीरावर आतापर्यंत तब्बल 11 टॅटू होते. मात्र आता काढलेल्या नव्या टॅटू सह ही संख्या 12 वर पोहोचली आहे. विराट आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाकडून खेळत असून तो आगामी आयपीएलसाठी सराव करण्याकरता विराटने आरसीबीचा कॅम्प जॉईंट केला आहे.
11 टॅटूच्या 11 स्टोरी, फक्त फॅशन म्हणून नाही तर… विराटच्या प्रत्येक Tattoo ला आहे खास कारण विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून यात विराटचा नवा टॅटू दिसत आहे. विराटने त्याच्या उजव्या हातावर हा नवा टॅटू काढला असून याची डिझाईन फुला प्रमाणे आहे. विराटच्या प्रत्येक टॅटूला काहीतरी अर्थ असतो. त्याने आतापर्यंत त्याच्या आई वडिलांच्या नावाचा, त्याच्या टेस्ट कॅप आणि वनडे कॅपचा नंबर, महादेव, ओम इत्यादी टॅटू काढले आहेत. अद्याप विराटने काढलेल्या नव्या टॅटूचा अर्थ समोर आला नसला तरी विराट लवकरच याबद्दल त्याच्या चाहत्यांना सांगेल अशी अपेक्षा आहे.