दुबई, 11 सप्टेंबर: आशिया चषकाच्या फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांनी श्रीलंकेला सुरुवातीला जोरदार धक्के दिले. पण हाणामारीच्या षटकात श्रीलंकन फलंदाजांनी पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली. त्यामुळे एक वेळ 5 बाद 58 अशी अवस्था असणाऱ्या श्रीलंकेनं 20 ओव्हरमध्ये 170 धावांचा डोंगर उभा केला. श्रीलंकेच्या या डावाला आकार देण्याचं काम केलं ते आयपीएल गाजवणाऱ्या भानुका राजपक्षेनं. राजपक्षेची दमदार खेळी पाचव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या राजपक्षेनं खणखणीत अर्धशतक झळकावून श्रीलंकेला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं नेलं. 5 बाद 58 अशी स्थिती असताना राजपक्षेनं आधी हसरंगा आणि करुणारत्नेहसह अर्धशतकी भागीदाऱ्या केल्या. त्यानं 45 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 71 धावा फटकावल्या. त्यानं हसरंगासह 58 तर करुणारत्नेसह 54 धावांची भागीदारी साकारली. त्यामुळे श्रीलंकेला 6 बाद 170 धावा स्कोअरबोर्डवर लावता आल्या.
A fighting total from Sri Lanka 🎯
— ICC (@ICC) September 11, 2022
Can Pakistan chase this down? #AsiaCup2022 | Scorecard: https://t.co/xA1vz7dqLy pic.twitter.com/Qe3fMKNlXU
भानुका राजपक्षेनं गेल्या आयपीएल मोसमात पंजाब किंग्सकडूनही दमदार कामगिरी बजावली होती. पाकिस्तानचं आक्रमण सुरुवातीला प्रभावी त्याआधी पाकिस्तानच्या नसीम खाननं भारताविरुद्ध अर्धशतक झळावलेल्या कुशल मेंडिसला पहिल्याच बॉलवर माघारी धाडलं. मग हॅरिस रौफनं श्रीलंकेला एकामागून एक धक्के दिले. रौफनं चार ओव्हरमध्ये 29 धावा देताना 3 विकेट्स काढल्या. तर नसीम शाह, शादाब खान आणि इफ्तिकारनं प्रत्येकी एक विकेट घेतली.