रावळपिंडी, 28 नोव्हेंबर: सध्या इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. 17 वर्षांनी इंग्लंड पाकिस्तानात कसोटी मालिका खेळणार आहे. 2005 साली इंग्लंडनं शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. त्यावेळी झालेली कसोटी मालिका शेवटची ठरली होती. पण आता 17 वर्षांनी पुन्हा एकदा पाकिस्तानात खेळण्यासाठी इंग्लंड संघ सज्ज झाला आहे. याचदरम्यान इंग्लंडचा स्टार खेळाडू बेन स्टोक्सनं एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान दौऱ्यात खेळताना स्टोक्स मानधन म्हणून एकही पैसा घेणार नाही. यामागचं कारणही तसंच आहे.
बेन स्टोक्सकडून पूरग्रस्तांना मदत
स्टोक्स सध्या इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. पण पाकिस्तानात पोहोचताच त्यानं हा मोठा निर्णय घेतला. पाकिस्तानातल्या काही भागात सध्या पुराचा मोठा प्रभाव आहे. बऱ्याच पाकिस्तानी नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. त्यासाठीच स्टोक्स या सीरीजमध्ये त्याला मिळणारं संपूर्ण मानधन पाकिस्तानातल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहे. सोशल मीडियात त्यानं याबाबत जाहीरपणे माहिती दिली आहे. त्याचबरोबर चाहत्यांनाही मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
You can donate here: https://t.co/g6h8Qv206b
— Ben Stokes (@benstokes38) November 28, 2022
हेही वाचा - Vijay Hajare Trophy: कोण आहे तो बॉलर ज्याला ऋतुराजनं ठोकले 7 सिक्स? 'या' खास अॅक्शनमुळे झाली होती चर्चा...
कधी आहे इंग्लंड-पाक कसोटी मालिका?
येत्या 1 डिसेंबरपासून उभय संघात तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. त्यातला पहिला कसोटी सामना रावळपिंडीत होईल. दुसरी कसोटी मुलतानमध्ये तर तिसरी कराचीत होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ben stokes, Cricket, Cricket news, Sports