मुंबई, 26 जानेवारी : भारतीय क्रिकेटपटूंचे दुखापतीचे ग्रहण अद्याप सुटलेलं नाही. न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्ध शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या तीन टी२० सामन्यांच्या मालिकेत खेळू शकणार नाही. रणजी ट्रॉफीत खेळताना ऋतुराजच्या मनगटाला दुखापत झाली होती. त्यानंतर दुखापतीतून सावरण्यासाठी तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गेला होता.
ऋतुराज गायकवाड मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला मुकणार आहे. सातत्याने होणाऱ्या दुखापतीमुळे बीसीसीआयसुद्धा नाराज आहे. याआधी श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेतून तो दुखापतीमुळे बाहेर पडला होता. आयर्लंड दौऱ्यावर पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे तो खेळला नाही आणि दुसऱ्या सामन्यात संघातून बाहेर पडला.
हेही वाचा : शोले 2 येतोय, टीम इंडियाचे जय-वीरू; हार्दिक पांड्याने शेअर केला धोनीसोबतचा फोटो
संघात स्थान पक्कं करण्यासाठी ऋतुराज गायकवाड संघर्ष करत आहे. तो संघाचा नियमित सदस्य नाही. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्याला संधी मिळते. आता ऋतुराज दुखापतग्रस्त असल्यानं पृथ्वी शॉला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. पृथ्वी शॉ बऱ्याच काळापासून संघातून बाहेर होता आणि त्याला न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेत संधी मिळाली आहे. जुलै २०२१ मध्ये पदार्पण केल्यानतंर ऋतुराज एक एकदिवसीय सामना आणि ९ टी२० सामने खेळला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.