मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /शोले 2 येतोय, टीम इंडियाचे जय-वीरू; हार्दिक पांड्याने शेअर केला धोनीसोबतचा फोटो

शोले 2 येतोय, टीम इंडियाचे जय-वीरू; हार्दिक पांड्याने शेअर केला धोनीसोबतचा फोटो

हार्दिक पांड्याने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीसोबतचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याफोटोमध्ये दोन्ही खेळाडू विंटेज बाइकवर बसलेले दिसतात.

हार्दिक पांड्याने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीसोबतचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याफोटोमध्ये दोन्ही खेळाडू विंटेज बाइकवर बसलेले दिसतात.

हार्दिक पांड्याने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीसोबतचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याफोटोमध्ये दोन्ही खेळाडू विंटेज बाइकवर बसलेले दिसतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 जानेवारी : भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीसोबतचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याफोटोमध्ये दोन्ही खेळाडू विंटेज बाइकवर बसलेले दिसतात. पांड्याने हा फोटो शेअर करताना म्हटलं की, "शोलेचा दुसरा भाग लवकरच येणार आहे." पांड्याने अनेकदा म्हटलं आहे की, माही भाईपासून प्रेरणा घेतलीय आणि धोनीला पाहूनच नेतृत्व कसं करायचं, मैदानावर शांत कसं रहायचं शिकलोय.

हार्दिक पांड्या आणि धोनीची मैत्री क्रिकेट जगतात प्रसिद्ध आहे. दोन्ही खेळाडू एकाच संघात खेळले आहेत. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलमध्ये तो अजुनही खेळतो. आगामी हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्याने सरावाला सुरुवात केली आहे. तर हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरुद्ध ३ टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार आहे.

हेही वाचा : क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 231 कोटींचा फटका, भारत दौऱ्याआधी कर्णधाराच्या भूमिकेने केलं नुकसान

टी२० मालिकेतील पहिला सामना २७ जानेवारी रोजी रांचीतील जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये खेळण्यात येणार आहे. आगामी सामन्यासाठी दोन्ही संघ रांचीत पोहोचले आहेत.

जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये भारतीय संघाची कामगिरी जबरदस्त आहे. आतापर्यंत तीन टी२० सामने झाले असून इथे भारताने विजय मिळवला आहे. हे तीन सामने श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध झाले होते. न्यूझीलंडविरुद्ध पहिला टी २० सामना शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजता होईल. त्याआधी सात वाजता नाणेफेक होणार आहे.

First published:

Tags: Cricket