Home /News /sport /

BBL Final जिंकल्याचं जीवघेणं सेलिब्रेशन, ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नाका तोंडातून रक्त, Shocking VIDEO

BBL Final जिंकल्याचं जीवघेणं सेलिब्रेशन, ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नाका तोंडातून रक्त, Shocking VIDEO

ऑस्ट्रेलियाची स्थानिक टी-20 स्पर्धा असलेल्या बिग बॅश लीग 2022 (Big Bash League 2022) मध्ये पर्थ स्कॉचर्स चॅम्पियन झाली आहे. मॅच जिंकल्यानंतर पर्थच्या खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला, पण हा जल्लोष धोकादायक ठरला कारण टीमचा फास्ट बॉलर झाय रिचर्डसनला (Jhye Richardson) दुखापत झाली.

पुढे वाचा ...
    मेलबर्न, 28 जानेवारी : ऑस्ट्रेलियाची स्थानिक टी-20 स्पर्धा असलेल्या बिग बॅश लीग 2022 (Big Bash League 2022) मध्ये पर्थ स्कॉचर्स चॅम्पियन झाली आहे. पर्थने फायनलमध्ये तीन वेळची विजेता टीम असलेल्या सिडनी सिक्सर्सचा (Perth Scorchers vs Sydney Sixers) 79 रननी पराभव केला. या विजयानंतर पर्थच्या टीमने जीवघेणं सेलिब्रेशन केलं, ज्यामुळे खेळाडूच्या नाका-तोंडातून रक्त आलं. बिग बॅश लीगचा हा 11 वा मोसम होता. या मोसमात विजय मिळवत पर्थने इतिहास घडवला. पर्थ स्कॉचर्सने सर्वाधिक 4 वेळा हा बिग बॅश लीगची ट्रॉफी जिंकली आहे. या सामन्यातल्या विजयासोबतच त्यांनी तीन वेळा ट्रॉफी जिंकलेल्या सिडनी सिक्सर्सना मागे टाकलं आहे. या दोघांशिवाय मेलबर्न रेनेगेड्स, ऍडलेड स्ट्रायकर्स, सिडनी थंडर्स आणि ब्रिस्बेन हिट्स यांनी प्रत्येकी 1-1 वेळी स्पर्धा जिंकली. रिचर्डसनला दुखापत मॅच जिंकल्यानंतर पर्थच्या खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला, पण हा जल्लोष धोकादायक ठरला कारण टीमचा फास्ट बॉलर झाय रिचर्डसनला (Jhye Richardson) दुखापत झाली. रिचर्डसनच्या नाका-तोंडातून रक्त यायला लागलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रिचर्डसन रुमालाने रक्त पुसताना दिसत आहे. सिडनीची टीम कोच घेऊन खेळली मॅचमध्ये टॉस हरल्यानंतर पर्थ स्कॉचर्सने पहिले बॅटिंग करत 6 विकेट गमावून 171 रन केले. लॉरी इव्हान्सने नाबाद 76 रनची खेळी केली. कर्णधार एश्टन टर्नरने 54 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर्सचा 16.2 ओव्हरमध्ये 92 रनवर ऑल आऊट झाला. कोरोना आणि दुखापतीमुळे सिडनीच्या टीममध्ये 11 खेळाडूही नव्हते, त्यामुळे टीमला सेमी फायनल आणि फायनलमध्ये असिस्टंट कोच जय लेंटनला घेऊन खेळावं लागलं. फायनलमध्ये झाय रिचर्डसनने 3.2 ओव्हरमध्ये 20 रन देऊन 2 विकेट घेतल्या. फायनलमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या लॉरी इव्हान्सला प्लेयर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं, तर बेन मॅकडरमॉटला प्लेयर ऑफ द सीरिज देण्यात आलं. मॅकडरमॉटने बिग बॅश लीगच्या यंदाच्या मोसमात 577 रन केले.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या