मुंबई, 13 फेब्रुवारी : महिली प्रीमियर लीगमध्ये आय़पीएलच्या तीन संघांनी भाग घेतला आहे. यात आरसीबीचा समावेश आहे. लिलावात आरसीबीने स्टार बॅटर स्मृती मानधनाला ३.४० कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं आहे. सध्या पाकिस्तान प्रीमियर लीगही सुरू असून त्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमला मिळालेल्या किमतीच्या दुप्पट बोली स्मृतीला लावण्यात आली होती. आता यावरून बाबर आजम आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ट्रोल होत आहे. स्मृती मानधनाची बेस प्राइज ५० लाख रुपये होती आणि तिच्यासाठी अनेक संघांनी बोली लावली होती. पण अखेरीस ३.४० कोटी रुपयांना आरसीबीने तिला आपल्या संघात घेतलं. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमची पाकिस्तान सुपर लीगमध्ये असलेली सॅलरी १.२४ कोटी इतकी आहे. तर स्मृतीला ३.४० कोटी रुपये इतकी बोली लागली. बाबर आजमपेक्षा स्मृतीला मिळालेली किंमत ही दुपटीपेक्षा जास्त आहे. हेही वाचा : स्मृतीला विक्रमी बोली, RCBने विराटसोबतचा फोटो शेअर करत केलं स्वागत आरसीबी स्मृती मानधनाला कर्णधारही करू शकते. सध्या स्मृती भारतीय महिला संघाची उपकर्णधार आहे. तिच्याकडे अनुभवही असून आरसीबीचे नेतृत्व तिच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये २२ सामने होणार आहेत. सर्व सामने ब्रेबॉन स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहेत.
महिला प्रीमियर लीगला सध्या महिला आयपीएल असंही म्हटलं जात आहे. यातला पहिला सामना ४ मार्च रोजी होणार आहे. ग्रुप स्टेजनंतर ३ संघ पुढे जातील आणि २ बाहेर पडतील. ग्रुप स्टेजला टॉप असलेले संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील तर इतर दोन संघात एलिमिनेटर सामना होईल.

)







