मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /AusvsPak : काय सुरू होतं पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये? समोर आला VIDEO

AusvsPak : काय सुरू होतं पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये? समोर आला VIDEO

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने टीमच्या ड्रेसिंग रूममधला एक व्हिडिओ (Babar Azam speech in dressing room) शेअर केला आहे.

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने टीमच्या ड्रेसिंग रूममधला एक व्हिडिओ (Babar Azam speech in dressing room) शेअर केला आहे.

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने टीमच्या ड्रेसिंग रूममधला एक व्हिडिओ (Babar Azam speech in dressing room) शेअर केला आहे.

    दुबई, 12 नोव्हेंबर : सध्या सुरू असलेल्या आयसीसी मेन्स टी-20 वर्ल्डकपमध्ये (ICC Mens T20 World Cup) गुरुवारी (11 नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा (Australia beats Pakistan) तब्बल 5 विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या या तडाख्यामुळे साखळी फेरीत पाचही सामने जिंकलेल्या आणि वर्ल्डकपचा प्रबळ दावेदार असणाऱ्या पाकिस्तानचा प्रवास सेमी फायनलमध्येच (Pakistan out of World cup) संपला. यानंतर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने टीमच्या ड्रेसिंग रूममधला एक व्हिडिओ (Babar Azam speech in dressing room) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून (PCB twitter) शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी कॅप्टन बाबर आझम सर्व टीमशी संवाद साधताना दिसतो आहे.

    बाबर आझमने (Babar Azam talks with team after defeat) या वेळी सर्व टीम, मुख्य कोच मॅथ्यू हेडन आणि बॉलिंग कोच वर्नोन फिलेंडर यांनाही संबोधित केलं. तो म्हणाला, “सर्वांनाच दुःख झालं आहे. सर्वांनाच माहिती आहे, की आपलं कुठे चुकलं आणि काय चुकलं. इथे बसलेल्या कोणीच आपल्याला हे सांगण्याची गरज नाही. कारण आपल्याला ते माहिती आहे; पण यातून आपल्याला हे शिकायला हवं, की आत्ता जी आपली एकी आहे, ती तुटायला नको. आपण हरलोय म्हणून एकमेकांवर आरोप करण्याची गरज नाही. एक टीम म्हणूनच आपण खराब प्रदर्शन केलं.” असं म्हणत त्याने सर्वांचे आभार मानले.

    “आपण हरलो. ठीक आहे, पण या पराभवानंतर आता आपण केवळ सकारात्मक विचार करायचा आहे. कुणीही कुणाकडे बोट करायचं नाही, कोणीही इथे कोणत्याही खेळाडूबाबत नकारात्मक गोष्टी बोलणार नाही. तसं कोणी करताना दिसलं, तर मग मी त्यांच्यासोबत माझ्या पद्धतीने समजावून सांगेन,” असा इशाराही (Babar Azam warns team) आझमने सर्वांना दिला. आता सर्वांनी पुढच्या तयारीला लागा आणि टीममध्ये जसं खेळीमेळीचं वातावरण आहे, ते तसंच राहू द्या, असंही बाबर सर्वांना म्हणाला. 'NDTV इंडिया'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    प्रजेला मोफत निरोध वाटणारा CONDOM KING, सोबत देतो मोलाचा संदेश

    या वेळी टीमचे मुख्य कोच आणि बॉलिंग कोचही यांनीही खेळाडूंशी संवाद साधला. तसंच, टीमचे अंतरिम कोच सकलेन मुश्ताक यांनीही खेळाडूंसोबत चर्चा केली. मुश्ताक म्हणाले, “या पराभवामुळे तुमच्या सर्वांची मैत्री आणखी गोड होईल. तसंच तुमची एकी आणि तुमचा एकमेकांवरचा विश्वासही वाढेल. तुम्ही एकत्र मिळून ही लढाई लढलात, आता याच प्रकारे पुढचा प्रवास सुरू ठेवा.”

    शोएब मलिकचे पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत Romantic Photo व्हायरल, फॅन्स म्हणाले...

    दरम्यान, पाकिस्तानला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने धडाक्यात फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. आता न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान या विश्वचषकाची अंतिम मॅच (T20 World cup Final) पार पडणार आहे.

    First published:
    top videos

      Tags: T20 world cup