भारतीय टेनिस स्टार रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झा यांना शुक्रवारी ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. मात्र पराभवानंतरही दोघांच्या खेळाचं कौतुक सोशल मीडियावर होत आहे.
सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांच्याशिवाय रोहन बोपन्नाच्या पत्नीचीही चर्चा सोशल मीडियावर आहे. एका चाहत्याने बोपन्नाच्या पत्नीबाबत केलेल्या कमेंटवर त्याने उत्तर दिल्यानं ही चर्चा सुरू झालीय.
ऑस्ट्रेलियन ओपनवेळी रोहन बोपन्नाला चिअर्स करण्यासाठी त्याची पत्नी सुप्रिया अन्नैयासुद्धा मेलबर्नवर होती. सामन्यावेळचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर चाहत्यांनी रोहन बोपन्नाला काही प्रश्नही विचारले आहेत.
सोशल मीडियावर एका चाहत्याने रोहन बोपन्नाच्या पत्नीचा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं की, बोपन्नाची पत्नी? मी आतापर्यंतच्या सर्वात सुंदर महिलेला पाहतोय का? यावर रोहन बोपन्नाने रिअॅक्शन देताना म्हटलं की, 'I, Agree'
रोहन आणि सुप्रिया २०१० पासून एकमेकांना डेट करत होते. रोहन बोपन्ना आणि सुप्रिया यांचे २०१२ मध्ये लग्न झालं होतं. दोघांना एक मुलगीसुद्धा आहे.
सुप्रिया ही व्यवसायाने सायकॉलॉजिस्ट आहे. ती सोशल मीडियावरसुद्धा सक्रीय असून तिने काही फोटोही शेअऱ केले आहेत.
रोहन बोपन्नाने जर अंतिम सामना जिंकला असता तर हा त्याचं हे दुसरं ग्रँड स्लॅम ठरलं असतं. याआधी बोपन्नाने २०१७ मध्ये गॅब्रिएल डॅब्रोवस्कीसोबत फ्रेंच ओपनच्या मिश्र दुहेरीत विजेतपद पटकावलं होतं.