मुंबई, 3 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना इंदोर येथील होळकर स्टेडियमवर खेळवला गेला. आज इंदोर येथील सामन्याचा तिसरा दिवस असून या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने तिसरा सामना 9 विकेट्सने जिंकला असून या मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवली आहे.
आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया समोर भारताने विजयासाठी केवळ 76 धावांचे आव्हान ठेवले होते. परंतु हे आव्हान पूर्ण करण्यापासून ऑस्ट्रेलियाला रोखण्यासाठी भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करून फलंदाजांची विकेट घेणे गरजेचे होते. परंतु भारतीय गोलंदाजांपैकी केवळ रविचंद्रन अश्विन यानेच 1 विकेट घेतल. तर फलंदाजीच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी नाबाद खेळी केली. ट्रॅव्हिस हेडने 53 चेंडूत 49 धावा केल्या. तर मार्नस लॅबुशेनने 58 चेंडूत 28 धावा केल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Team india, Test cricket